Morning Heel Pain: सकाळी झोपेतून उठताच पायाचे तळवे दुखतायत? ‘या’ गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण; डॉक्टरांनी सांगितली कारणं

Foot Pain in the Morning: सकाळी उठल्यावर टाच किंवा पायाच्या तळव्याला दुखत असल्यास प्लांटर फॅसिआयटिस, हील स्पर, संधिवात किंवा नसांशी संबंधित समस्या कारणीभूत असू शकतात. टाचदुखीची संभाव्य कारणं, वेदना कमी करण्यासाठी उपाय, योग्य पादत्राणांची निवड आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा ते पाहूयात.
Morning Heel Pain
Morning Heel Painsaam tv
Published On: 

सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाय जमिनीवर ठेवताच टाच किंवा तळव्याला जोरात दुखतंय का? सुरुवातीची काही पावलं टाकतानाही त्रास होतोय का? अनेकांना असा त्रास जाणवतो. काही जण याकडे दिवसभराचा थकवा किंवा जास्त चालल्यामुळे होणारी वेदना म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र हा त्रास वारंवार होत असेल तर त्यामागे आरोग्याशी संबंधित काही कारणं असू शकतात. त्यामुळे वेळीच त्याचं कारण समजून घेणं आणि योग्य उपचार करणं गरजेचं आहे.

डॉक्टरांनी सकाळी उठल्यानंतर पायाच्या तळव्याला दुखण्यामागची संभाव्य कारणं सांगितली आहेत. ही कारणं नेमकी काय आहेत ते पाहूयात.

प्लांटर फॅसिआयटिस

सकाळी उठल्यानंतर टाच किंवा पायाच्या तळव्याला दुखण्यामागे प्लांटर फॅसिआयटिस हे एक सामान्य कारण आहे. आपल्या पायाच्या तळव्यामध्ये जाड ऊतींचा एक पट्टा असतो. तो टाच आणि पायाची बोटं यांना जोडण्याचं काम करतो. या भागाला सूज आली किंवा जळजळ झाली, तर पाय दुखू शकतो.

Morning Heel Pain
Cancer symptoms in women: महिलांनो शरीरात ही 5 लक्षणं दिसली तर व्हा सावध; कॅन्सरच्या गाठीची आहेत लक्षणं

बराच वेळ बसून राहिल्यानंतर किंवा रात्रीची झोप झाल्यावर सकाळी पहिलं पाऊल टाकताना हा त्रास जास्त जाणवतो. काही वेळ चालल्यानंतर वेदना कमी होऊ शकतात. मात्र बराच वेळ उभं राहिल्यास पुन्हा पाय दुखू लागतो.

टाचेच्या हाडाची वाढ

टाचेच्या हाडाजवळ हाडाचा अतिरिक्त भाग तयार होऊ शकतो. याला ‘हील स्पर’ असं म्हणतात. काही लोकांमध्ये यामुळे टाच दुखू शकते. मात्र हील स्पर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला वेदना होतातच असं नाही. याशिवाय पायाला व्यवस्थित न बसणारे किंवा योग्य आधार न देणाऱ्या चपला घालणं, बराच वेळ उभं राहणं आणि पायांवर जास्त भार पडणं यामुळेही तळव्याला दुखू शकतं. त्यामुळे पाय दुखत असल्यास आपण कोणत्या प्रकारच्या चपला किंवा बूट वापरतो, याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.

Morning Heel Pain
Stomach Pain: पोटदुखीला गॅस किंवा अॅसिडिटी समजून दुर्लक्ष करताय? मग शरीराने दिलेले हे गंभीर संकेत वेळीच ओळखा!

संधिवात

पायाच्या तळव्याला दुखण्यासोबत सूज येत असेल, त्वचा लाल होत असेल किंवा सांधे आखडल्यासारखे वाटत असतील तर संधिवातासारख्या आजारांची तपासणी करणं आवश्यक आहे. काही वेळा पाय दुखण्यामागे नसांशी संबंधित समस्याही असू शकतात. पायात वेदना होण्यासोबत मुंग्या येणं, जळजळ होणं किंवा पाय बधिर झाल्यासारखं वाटणं अशी लक्षणं दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्येही नसांना इजा झाल्यामुळे पायांमध्ये जळजळ, मुंग्या येणं किंवा बधिरपणा जाणवू शकतो. त्यामुळे अशी लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

पायाच्या तळव्याचं दुखणं कमी करण्यासाठी काय करावं?

पायाच्या तळव्याला होणारा त्रास कमी करण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देता येईल.

  • योग्य चपला किंवा बूट वापरा- पायाला आराम मिळेल आणि चांगला आधार मिळेल, अशा चपला किंवा बूट घाला.

  • सकाळी हलका व्यायाम करा- बिछान्यातून उठण्यापूर्वी पायाची बोटं आणि पोटरीचे स्नायू हळूवार ताणा. यामुळे पायांवरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.

  • थंड शेक घ्या- पायाच्या तळव्यावर थंड शेक घेतल्याने वेदना कमी होण्यास मदत मिळू शकते.

  • त्रास वाढत असल्यास डॉक्टरांना भेटा- पायाचं दुखणं सतत होत असेल, वाढत असेल किंवा चालताना त्रास होत असेल, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

Morning Heel Pain
Cancer Symptoms: अचानक वजन कमी होतंय? किती किलो वजन घटणं हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं? डॉक्टरांनी सांगितले महत्त्वाचे संकेत

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com