Stomach Pain: पोटदुखीला गॅस किंवा अॅसिडिटी समजून दुर्लक्ष करताय? मग शरीराने दिलेले हे गंभीर संकेत वेळीच ओळखा!

Causes of Stomach Pain: पोटदुखी म्हणजे गॅस किंवा अॅसिडिटीच असेल असे नाही. अपेंडिक्सची सूज, पित्ताशयातील खडे आणि हृदयाशी संबंधित समस्या यांची लक्षणे ओळखा. तीव्र वेदना, उलटीत रक्त, काळी शौच किंवा छातीत अस्वस्थता जाणवल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या.
Stomach Pain
Stomach Painsaam tv
Published On: 

पोटदुखीच्या त्रासाकडे अनेकजण अॅसिडिटी किंवा गॅसचा त्रास म्हणून पाहतात आणि औषधं घेऊन तो त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र पोटदुखीमागे अपेंडिक्सची सूज, पित्ताशयातील खडे किंवा इतर गंभीर आजारही असू शकतात. त्यामुळे पोटदुखी वारंवार होत असेल, तीव्र वेदना होत असतील किंवा इतर असामान्य लक्षणं जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

नवी मुंबईतील न्यूईरा हॉस्पिटल्सच्या हेपॅटोलॅाजिस्ट आणि एंडोस्कोपिस्ट , गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. दीप्ती विश्वनाथन यांनी सांगितलं की, पोटामध्ये अनेक महत्त्वाचे अवयव असतात. पोट, आतडी, पित्ताशय, अपेंडिक्स आणि स्वादुपिंड यांपैकी कोणत्याही अवयवातील समस्येमुळे वेदना होऊ शकतात. काही वेळा अपचनासारखा वाटणारा त्रास हृदयाशी संबंधित समस्येमुळेही उद्भवू शकतो. त्यामुळे पोट दुखत असल्यास प्रत्येक वेळी तो गॅसमुळेच झाला आहे, असं गृहीत धरणं योग्य नाही.

Stomach Pain
Kidney Cancer: किडनीत कॅन्सरची गाठ तयार होण्यापूर्वी शरीरात दिसतात ही 6 लक्षणं

पोटात अचानक तीव्र वेदना होणं, वेदना हळूहळू वाढत जाणे किंवा नेहमीच्या पोटदुखीपेक्षा वेगळा त्रास जाणवणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. अशा वेळी स्वतःच्या मनाने औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अपेंडिसायटिसचं लक्षण वेळीच ओळखा

नाभीच्या आसपास सुरू झालेल्या वेदना हळूहळू पोटाच्या उजव्या खालच्या भागात सरकत असतील आणि त्यासोबत ताप, मळमळ किंवा उलट्या होत असतील, तर हे अपेंडिक्सला सूज आल्याचं म्हणजेच अपेंडिसायटिसचं लक्षण असू शकतं. अशा वेळी तातडीने वैद्यकीय तपासणी करणं आवश्यक आहे.

पोटाच्या वरच्या भागात किंवा उजव्या वरच्या बाजूला तीव्र वेदना होत असतील आणि त्या अनेक तास कायम राहत असतील, तर त्यामागे पित्ताशयातील खडे किंवा पित्ताशयाला आलेली सूज हे कारण असू शकते. अशा वेदनांसोबत ताप येणं किंवा डोळे पिवळे पडणं अशी लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावं.

Stomach Pain
Gastric cancer symptoms: पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर सर्वप्रथम कोणतं लक्षण दिसतं? 99% लोकं या 6 लक्षणांकडे करतात दुर्लक्ष

गंभीर आजारांचे संकेत

काही लक्षणं ही गंभीर आजारांचे संकेत ठरू शकतात. उलटीतून रक्त येणं, शौचाचा रंग काळा होणं किंवा शौचावाटे रक्तस्राव होणं, गिळताना त्रास होणं, कोणतेही स्पष्ट कारण नसताना वजन कमी होणं, वारंवार उलट्या होणं किंवा पुन्हा पुन्हा पोटदुखीचा त्रास होणं अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

काही वेळा हृदयाशी संबंधित समस्या अपचन किंवा पोटाच्या वरच्या भागातील वेदनांसारख्या जाणवू शकतात. छातीत किंवा पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थता जाणवण्यासोबत घाम येणं, धाप लागणं, मळमळणं, चक्कर येणं किंवा या वेदना हात, जबडा अथवा पाठीपर्यंत पसरणं अशी लक्षणं आढळल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

पोटदुखी झाली म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र प्रत्येक वेळी त्याला अॅसिडिटी किंवा गॅस समजून स्वतःच उपचार करणंही योग्य नाही. वेदना कधी सुरू होतात, किती वेळ टिकतात आणि त्यासोबत कोणती लक्षणं जाणवतात याकडे लक्ष द्यावं. पोटदुखी तीव्र असेल, वारंवार होत असेल किंवा नेहमीपेक्षा वेगळी जाणवत असेल, तर वेळ न दवडता वैद्यकीय सल्ला घ्या.

Stomach Pain
Cancer Symptoms: अचानक वजन कमी होतंय? किती किलो वजन घटणं हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं? डॉक्टरांनी सांगितले महत्त्वाचे संकेत

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com