Cancer symptoms in women: महिलांनो शरीरात ही 5 लक्षणं दिसली तर व्हा सावध; कॅन्सरच्या गाठीची आहेत लक्षणं

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सरचा शरीरावर परिणाम

कॅन्सर हा शरीराच्या कोणत्याही अवयवात होऊ शकणारा आजार आहे. कॅन्सरची वाढ झाल्यास संबंधित अवयवाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो आणि आजाराच्या स्वरूपानुसार शरीरातील इतर यंत्रणांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शरीरात असामान्य बदल जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

cancer signs in women | saam tv

शरीरात दिसणारी लक्षणं

कॅन्सर शरीरात वाढू लागल्यानंतर काही लक्षणं किंवा शारीरिक बदल जाणवू शकतात. ही लक्षणं कॅन्सर कोणत्या अवयवात आहे आणि आजार किती वाढला आहे यानुसार वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे शरीरात नवीन किंवा सतत जाणवणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नये.

women cancer symptoms | saam tv

अनियमित मासिक पाळी

मासिक पाळी अनियमित होणं हे महिलांनी दुर्लक्षित करू नये. पाळीच्या काळात नेहमीपेक्षा जास्त रक्तस्राव होणं हे देखील मोठं लक्षण आहे. अशा बदलांमागे विविध कारणं असू शकतात, त्यामुळे हा त्रास वारंवार होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

breast swelling | saam tv

स्तनाच्या त्वचेत बदल

स्तनाची त्वचा लाल होणं किंवा त्वचा वेगळी दिसणं हे देखील मोठे बदल आहेत. काही प्रकारच्या स्तनाच्या कॅन्सरमध्ये त्वचेच्या स्वरूपात असे बदल दिसू शकतात. त्यामुळे स्तनाच्या त्वचेत अचानक किंवा सतत बदल जाणवल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

heavy menstrual bleeding | saam tv

वेदना आणि थकवा

शरीरात कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय वेदना होणे किंवा अशक्तपणा जाणवणे हे दुर्लक्षित करू नये. दिवसेंदिवस वाढणारा थकवा तसेच कंबर, पोट किंवा हाडांमध्ये होणाऱ्या वेदना विविध आजारांमध्ये दिसू शकतात. ही लक्षणं सतत जाणवत असल्यास त्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

endometrial cancer symptoms | saam tv

स्तनामध्ये गाठ किंवा सूज

महिलांच्या स्तनामध्ये गाठ किंवा सूज जाणवणं हे स्तनाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. गाठीसोबत स्तनाचा आकार आणि ठेवण यामध्येही बदल दिसू शकतो. स्तनामध्ये असा कोणताही नवीन बदल जाणवल्यास डॉक्टरांकडून त्याची तपासणी करून घ्यावी.

women health | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

cancer early detection | saam tv

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Morning drink | saam tv
येथे क्लिक करा