धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केला होता ठाण्यातील टेंभी नाका परिसरात शारदीय नवरात्र उत्सव.
ढोल ताशाच्या गजरात आतिषबाजी करत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात.
मोठ्या प्रमाणात देवीला निरोप देण्यासाठी भक्तांची उपस्थिती.
भाजप बद्दल बोलले म्हणून मी बोलतो आहे मात्र त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचा नाम उल्लेख केला आहे त्यामुळे आहे त्याचा सविस्तर खुलासा एकनाथ शिंदे साहेब हे करतीलच...
जरांगे पाटलांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये त्यांचं त्यांच्या समाजाला आरक्षण देण्याचे काम आहे त्यांनी ते करावं.
*उगाच अशा पद्धतीचे वक्तव्य करून आमच्या दोन पक्षांमध्ये मत मतांतरे मतभेद तयार करायचे मात्र त्यातून काही होणार नाही
अशा पद्धतीचे वक्तव्य करून आमच्या मध्ये कोणी एकमेकांना संपवायला निघालेले नाही.
जरांगे यांनी जे आरोप केलेले आहेत. कोणी सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. एकनाथ शिंदे चांगलं काम करतात आरोप करणाऱ्यांना आरोप करू द्या. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे.. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
विजयीदशमी निमित्ताने सांगलीच्या विटा येथे ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.दीडशे वर्षांची मोठी प्रदीर्घ परंपरा असणारया पालखी शर्यत सोहळ्यात विट्याचा श्री रेवणसिध्द देव व मूळस्थान येथील श्री रेवणसिध्द देव या दोन देवांच्या पालख्यामध्ये शर्यत झाली.ज्यामध्ये
मूळस्थानच्या पालखीने निर्णायक क्षणी आघाडी घेत पालखी शर्यत जिंकली.
रेवणसिध्दाच्या नावानं चांगभलं"च्या गजराने अवघी विटा नगरी यावेळी दुमदुमून गेली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यासाठी ठाण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. काही वेळातच ते मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या भाषणातून कोणते मुद्दे मांडले जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
बारामती शहरातील काँग्रेस भवनासमोर काँग्रेस नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हे बॅनर लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या बॅनरवर ‘मा. सतेज उर्फ बंटी पाटील – भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत बिनविरोध विजयी झाल्याबद्दल सतेज पाटील यांचे हार्दिक अभिनंदन, असाही मजकूर बॅनरवर आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गांधरे येथे रहात्या घरात कांता जाधव या वृद्ध महिलेची हत्या करून चोरट्यांनी अंगावरील दागिने लंपास केले. महिलेचा मुलगा नवरात्रोत्सवासाठी बाहेर गेला असताना चोरट्यांनी घरात घुसून हा गुन्हा केल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री उशिरा मुलगा घरी परतला असता घराचे दार उघडे आणि आई मृतावस्थेत आढळल्याने त्याने वाडा पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिस आणि फॉरेन्सिक पथकाने तपास केला असून, पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वाडा रुग्णालयात पाठवण्यात आला.
ठाणे महापालिका मुख्यालयासमोर वाहनचालक सुनील खरपडे आणि वृत्तवाहिनीचे कॅमेरामन विनय राज्यभर यांच्यात हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या प्रकरणाची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तातडीने दखल घेत सुनील खरपडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दसऱ्याच्या सुट्टीच्या निमित्ताने पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्याला पसंती दिली आहे. राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने पर्यटक अलिबागमध्ये दाखल झाले आहेत. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची लगबग पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक पद्धतीने शाल पांघरून रुबियो यांचा सन्मान केला. तसेच, मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे प्रतीक असलेल्या गेटवे ऑफ इंडिया आणि परिसराची माहिती त्यांना दिली.
उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे ऑक्सिजन सिलिंडरने भरलेल्या पिकअप व्हॅनचा भीषण अपघात झाला. बछरावां परिसरातील टोलनाक्याजवळ ही व्हॅन डिव्हायडरला धडकली. धडकेनंतर व्हॅनमधील ऑक्सिजन सिलिंडर हवेत उडून रस्त्यावर आदळले. या भीषण दुर्घटनेत चालक आणि कंडक्टरचा मृत्यू झाला. अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
मीरा रोड येथे लोटस नवरात्रोत्सवात गरबा-दांडिया खेळताना ३० वर्षीय मीत रुपडा या तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दांडिया खेळत असताना मीतच्या छातीत अचानक दुखू लागले आणि तो खाली कोसळला. त्याला तातडीने भाईंदर येथील तुंगा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
भगवान भक्तीगडावरून पंकजा मुंडे दसरा मेळाव्यासाठी उपस्थित आहेत. मेळाव्याला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पंकजा मुंडेचे भाषण सुरू झाले आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत डॉ. संगीता शिंदे यांच्या प्रचारसभेत माजी शिक्षक आमदार ना. गो. गाणार आणि मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तायडे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “आमचा प्रतिनिधी हा शिक्षकच असला पाहिजे. पाकीट, साड्या वाटणाऱ्या, जेवणावळी घालणाऱ्या आणि मद्य देणाऱ्यांची आमचा प्रतिनिधी होण्याची लायकी आहे का?” असा सवाल ना. गो. गाणार यांनी उपस्थित केला. तसेच, शाळा चालवण्यासाठी ५ ते २० टक्के रक्कम खंडणीच्या स्वरूपात वसूल केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी शिक्षण क्षेत्रातील परिस्थितीवर भाष्य केले.
नाशिक जिल्ह्यातील उमराणा बाजार समितीत दसऱ्याचा मुहूर्त साधत नव्या लाल कांद्याच्या लिलावाला सुरुवात करण्यात आली. लिलावाच्या पहिल्याच दिवशी लाल कांद्याला मुहूर्ताचा ७,१७१ रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. कसमादे परिसरातील मोठी बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या उमराणा बाजार समितीत दसऱ्याच्या मुहूर्तावर नव्या लाल कांद्याच्या लिलावाची सुरुवात करण्याची आणि मुहूर्ताच्या कांद्याला चांगला भाव देण्याची परंपरा आहे. त्यानुसार, आज दसऱ्यानिमित्त बाजार समिती सुरू ठेवण्यात आली होती. यावेळी सुमारे ४५ वाहनांमधून कांद्याची आवक झाली.
दसरा म्हणजे विजय, समृद्धी आणि नवीन कार्याची सुरुवात करण्याचा सण. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या शुभमुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा आजही कायम आहे. यंदाही दसऱ्यानिमित्त ग्राहकांमध्ये दागिने खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. सध्या सोन्याचे भाव स्थिरावले असून, दिवाळीपर्यंत बाजारात अशीच परिस्थिती राहील, असा विश्वास पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीचा शिधा घेऊन आज ट्रक रवाना होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सर्व ट्रकना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमधून हे ट्रक दुष्काळग्रस्त भागांकडे रवाना होतील. जवळपास १८ ते २० ट्रकच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत दिवाळीचा शिधा पोहोचवण्यात येणार आहे.
बीडच्या नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याला संबोधित करण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र नारायणगडावर संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराज आणि विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. यावेळी गडाचे महंत शिवाजी महाराज हेदेखील उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक येणार असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले. राज्यात दुष्काळी परिस्थिती असून, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवार आणि आता गांधी कुटुंब चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. बीएलए नियुक्त करण्यासाठीही उद्धव ठाकरे गटाकडे कार्यकर्ते आणि संघटना नसल्याची टीका त्यांनी केली. तसेच, “संजय राऊत यांनी एक नगरसेवक निवडून आणून दाखवावा,” असे आव्हान त्यांनी दिले.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील पराभवामुळे निराश होऊ नका, उद्यापासून आपण पुन्हा एकदा कामाला लागूया, असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. पराभवाचे चिंतन करण्यासाठी उद्या मेळावा आयोजित करण्यात आला असून, सर्वांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे चिंतन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
पुरंदर या शासकीय निवासस्थानी करणार गृहप्रवेश
पुरंदर निवासस्थानावरून राष्ट्रवादी व शिवसेनेत झाली होती रस्सीखेच
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडून ही होती मागणी
अखेर सचिन अहिर घेणार पुरंदरचा ताबा
बीड जिल्ह्यात होणार दोन दसरा मेळावे. श्री क्षेत्र नारायण गडावरील एक तर भगवान भक्ती गड सावरगाव घाट येथील दसरा मेळावे पार पडणार आहेत. याच दसरा मेळाव्यात श्रीक्षेत्र नारायण गडावरून मनोज जरांगे पाटील येणाऱ्या भाविकांना काय संबोधित करणार त्याचबरोबर भगवान भक्ती गड सावरगाव घाट येथून मंत्री पंकजा मुंडे आमदार धनंजय मुंडे नेमकं येणाऱ्या भाविकांना काय संबोधित करणार याकडे मात्र बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एका गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखासह दहा सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
कात्रज, आंबेगाव, बिबवेवाडी आणि धनकवडी परिसरातील तडीपार केलेल्या या गुन्हेगारांवर खून, खुनाचा प्रयत्न,दरोडा, दरोड्याची तयारी, खंडणी उकळणे, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे, गंभीर दुखापत, अमली पदार्थांची विक्री, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि दहशत माजवणे यांसारखे वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
अत्यल्प पाऊस आणि वाढत्या तापमानाचा मोठा फटका वाशिम जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. पाण्याअभावी आणि वाढत्या उष्णतेमुळे केळी पिकाचं तब्बल ७५ टक्के नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने केळीची हिरवीगार पानं करपून चालली आहेत. याचा थेट परिणाम फळधारणेवर झाला असून नवीन फळांची गळती होत आहे, तर केळीच्या घडांचं वजनही कमी भरत आहे. एकीकडे पिकासाठी केलेला लाखोंचा खर्च, तर दुसरीकडे उत्पन्नात घट होण्याची भीती, अशा दुहेरी संकटात केळी उत्पादक शेतकरी सापडले आहेत.
सोलापूर - शिक्षक नसतानाही शिक्षक असल्याचे दाखवून शिक्षक मतदार यादीत नाव नोंदवलं होतं
बार्शी शहर पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बार्शीचे गटशिक्षण अधिकारी गजानन बाजड यांच्या तक्रारीवरून कारवाई
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकरण उघड
शिक्षक मतदार यादीतील बोगस नोंदींप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल
ज्या शाळांच्या माध्यमातून नावनोंदणी झाली, त्या शाळांची आणि मुख्याध्यापकांची चौकशी करण्याची मागणी
संबंधित अर्जदार शिक्षक नसल्याचे शाळांच्या मुख्याध्यापकांनी कळविल्याचा तक्रारदाराचा दावा
बार्शी शहर पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बार्शीचे गटशिक्षण अधिकारी गजानन बाजड यांच्या तक्रारीवरून कारवाई
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकरण उघड
शिक्षक मतदार यादीतील बोगस नोंदींप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल
ज्या शाळांच्या माध्यमातून नावनोंदणी झाली, त्या शाळांची आणि मुख्याध्यापकांची चौकशी करण्याची मागणी
संबंधित अर्जदार शिक्षक नसल्याचे शाळांच्या मुख्याध्यापकांनी कळविल्याचा तक्रारदाराचा दावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर
राष्ट्रपती द्रोपर्दी मुर्मू यांची घेणार भेट
भेट घेऊन नाशिक कुंभ मेळ्याचं देणार निमंत्रण
साताऱ्यात पदवीधर निवडणुकीवरून महायुतीत धुस फूस
महायुतीच्या उमेदवाराला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची नापसंती
साताऱ्यात राष्ट्रवादीच्या (AP ) कार्यकर्ते,नेत्यांची बैठक संपन्न
पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या अनुषंगाने बोलवली बैठक
बैठकीला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी फिरवली पाठ.मोकळ्या खुर्च्यांनी वेधले लक्ष
पुणे- पीएमपीच्या बस डेपोत सुधारणा करा
पुण्याच्या आयुक्तांचे आदेश
पुढील वर्षभरात पीएमपीच्या ताफ्यात नव्या दोन हजार ५०० बसेस दाखल होणार आहेत.
त्यामुळे पीएमपीच्या डेपोमध्ये सुधारणा करणे, पायाभूत सुविधा पुरविण्याचे आदेश महापालिका आयुक्त यांनी दिले आहेत.
सध्या पीएमपीच्या ताफ्यात सुमारे १९०० बस आहेत. तर प्रवाशांची दैनंदिन संख्या ११ ते १२ लाख इतकी आहे.
पुणे - सुवर्णवस्त्रांनी सजली सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवी
श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग ; देवीला १६ किलो सोन्याची साडी परिधान
आकर्षक कलाकुसर करून सजलेली १६ किलो सोन्याची साडी आणि सुमारे २ किलो सोन्यापासून तयार करण्यात आलेला रत्नजडित मुकुट दसऱ्यानिमित्त सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला परिधान करण्यात आला.
सुवर्णवस्त्रांनी सजलेले हे महालक्ष्मी देवीचे रूप पाहण्यासोबतच दर्शनाकरिता पुणेकरांनी मोठे गर्दी केली.
श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे वर्षातून दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजन या दिवशी देवीला ही साडी परिधान करण्यात येते.
सांगली - शिवप्रतिष्टानच्या दुर्गामाता दौडीचा आज मोठ्या उत्साहात समारोप
नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीतील 'दुर्गामाता दौडिस ' मोठ्या उस्ताहात सुरुवात झाली होती.
नवरात्र उस्त्वात नऊ दिवस शहरातील विविध भागातून ही दौड काढण्यात येते.
आज रस्त्यावरून रांगोळी काढून या शिवप्रतिष्टानच्या दुर्गामाता दौडीचा आज मोठ्या उत्साहात समारोप करण्यात आला.
पुणे - अनधिकृत होर्डिंगवर आता AI ची नजर
पुणे महापालिकेचा नियमबाह्य जाहिरात फलकांविरोधात डिजिटल हातोडा
पुणे शहरातील सव्वा लाखांहून अधिक अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग्जवर नियंत्रण ठेवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर.
शहरातील होर्डिंग्जचे डिजिटल मॅपिंग आणि विशेष कॅमेऱ्यांच्या मदतीने स्कॅनिंग करण्यात येणार.
महापालिकेच्या अधिकृत डेटाबेसमध्ये नोंद नसलेले होर्डिंग आढळल्यास AI प्रणालीकडून अलर्ट.
अनधिकृत होर्डिंगचा फोटो आणि GPS लोकेशन थेट महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला पाठवले जाणार.
मंजूर आकारापेक्षा मोठे आणि नियमबाह्य होर्डिंग्जही तंत्रज्ञानाच्या मदतीने ओळखता येणार.
सोलापूर - दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूरजिल्हा प्रशासनाकडून 'वॉर रूम'ची निर्मिती होणार
या रूममधून पिण्याच्या पाण्याचा टँकर, चारा यांसह विविध अडचणी सोडविण्यात येतील.
तसेच सावकारांकडून होणारा त्रास, बँका, फायनान्स कंपन्यांकडून होणारी सक्तीची वसुली होऊ नये, यासाठी प्रयत्न होतील अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
पुणे - टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणात रॅपिडो चालकाचे नाव समोर आल्याच्या वृत्ताने खळबळ
रॅपिडोच्या बेकायदेशीर बाईक टॅक्सी व्यवसायाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची महाराष्ट्र कामगार सभेची मागणी
चालक आणि प्रवाशांची अनिवार्य केवायसी, पोलीस पडताळणी करण्याची मागणी
राष्ट्रीय सुरक्षेला धोका, करसंकलनातील अपारदर्शकता आणि परिवहन विभागाच्या निष्क्रियतेवर उपस्थित केले प्रश्न
रॅपिडोच्या राज्यातील कामकाजावर बंदी घालून कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी
कोल्हापूर- शारदीय नवरात्र उत्सवाच्या अष्टमीला अंबाबाई देवीची नगर प्रदक्षिणा सोहळा
हजारो कोल्हापूरकरांची अंबाबाई देवीच्या नगर प्रदक्षिणेला हजेरी
राष्ट्राय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी कार्यक्रम
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजवंदना आणि शस्त्र पूजन
या कार्यक्रमाला माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी दाखल
नागपूर - राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात उपस्थित
- गेल्या काही दिवसांपासून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल प्यारे खान विरोधात भूमिका घेत आहेत
- प्यारे खान यांची संघ स्थानी उपस्थिती संघ परिवारात चर्चेचा विषय
- माहितीनुसार संघाच्या निमंत्रणावरून प्यारे खान विजयादशमी सोहळ्यात उपस्थित
नागपूर - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर लाखो भीम अनुयायी दाखल
- महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांतून भाविक नागपुरात दाखल झाले.
- जय भीमच्या घोषणा देत अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.
- जपान, थायलंड आणि श्रीलंकेतूनही बौद्ध भिक्खू दीक्षाभूमीवर आले.
- भाविकांसाठी पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत आणि मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
- दीक्षाभूमी परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
- बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी दिवसभर भाविकांची गर्दी कायम होती.
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचा समारोप रेशीमबाग मैदानावर विजयादशमी आणि शस्त्रपूजन उत्सवाने होणार.
- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भाषणाकडे देशाचे लक्ष.
- संघाच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट होण्याची अपेक्षा.
- जगभरातील जेन-झी आंदोलन, तरुणांचा असंतोष, बेरोजगारी, महागाई आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीवर भागवत काय बोलणार, याची उत्सुकता.
नांदेडच्या देगलूरमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ
महिलेवर हल्ला करून केले गंभीर जखमी
लाइन गल्लीतील घटनेने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
धाराशिव- तुळजाभवानी देवीची हत्ती वाहनावरून छबिना मिरवणूक
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या नवव्या माळेदिवशी दुर्गाष्टमीनिमित्त रात्री काढण्यात आली छबिना मिरवणूक
आज शिवसेनेचा दसरा मेळावा
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिवसेनेकडून दसऱ्याचा मुहूर्त
आणि याच दसरा मेळाव्याचा मुहूर्त साधत शिवसेनेकडून शेतकऱ्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा मदतीचा हात
उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवत जीवनावश्यक मदतीच्या साहित्याचे ट्रक दुष्काळग्रस्त भागाकडे रवाना होणार
दुष्काळग्रस्त भागात जात या जीवनावश्यक वस्तूंचे शेतकऱ्यांना वाटप होणार
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निर्णय
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.