team india saam tv
Sports

Team India: 'पैसे कमावणं म्हणजेच सर्व काही नसतं..' वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची BCCI च्या कारभारावर जोरदार टीका..

BCCI: माजी भारतीय क्रिकेटपटूने बीसीसीआयला धारेवर धरत मोठं वक्तव्य केले आहे.

Ankush Dhavre

Dilip Vengsarkar: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघाचा २०९ धावांनी धुव्वा उडवत ऑस्ट्रेलियाने जेतेपदाला गवसणी घातली होती.

या निराशाजनक कामगिरीनंतर रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र त्याला कर्णधार पदावरून केव्हा काढलं जाणार याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाहीये.

आता भारतीय संघाचं लक्ष केवळ वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेवर असणार आहे. यावेळी स्पर्धचे आयोजन भारतात केले जाणार आहे. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटूने बीसीसीआयला धारेवर धरत मोठं वक्तव्य केले आहे.

निवडकर्त्यांवर साधला निशाणा..

भारतीय संघाला १९८३ वर्ल्ड कप विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे दिलीप वेंगसरकर यांनी हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'दुर्दैवाची बाब अशी की, गेल्या ६-७ वर्षात मी जे निवडकर्ते पाहिले आहेत, त्यांना ना क्रिकेटची जाण आहे. ना खेळाचं सखोल ज्ञान आहे. जेव्हा भारतीय संघाचे दौरे ओव्हरलॅप झाले त्यावेळी भारतीय संघातील प्रमुख खेळाडू उपलब्ध नव्हते. तेव्हा शिखर धवनकडे संघाची जबाबदारी सोपवली गेली होती. भावी कर्णधार तयार करण्याची ही एक नामी संधी होती.' (Latest sports updates)

तसेच ते पुढे म्हणाले की, 'तुम्ही कुठल्याच खेळाडूला तयार केलं नाही. तुम्ही येता फक्त खेळता. तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाबद्दल बोलता, पण तुमची बेंच स्ट्रेंथ कुठे आहे? केवळ आयपीएल असणं, माध्यमातील हक्कातुन कोट्यवधी रुपये कमवणं ही एकमेव उपलब्धी नसावी.'

भारतीय संघ येत्या जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दौऱ्यासाठी युवा भारतीय खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. ज्यात रिंकू सिंग, यशस्वी जयस्वाल, जितेश शर्मा सारख्या खेळाडूंचा समावेश असू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

SCROLL FOR NEXT