Digvesh Rathi Notebook Celebration x
Sports

Digvesh Rathi : मानधन ३० लाख अन् दंड बसला ५ लाख! दिग्वेश राठीला नोटबुक सेलिब्रेशन भोवलं

LSG VS MI Highlights IPL 2025 : एकाना स्टेडियममध्ये काल लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना खेळला गेला. या सामन्यात लखनऊचा गोलंदाज दिग्वेश राठीने नमन धीरला बाद केल्यानंतर नोटबुक सेलिब्रेशन केले.

Yash Shirke

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना काल एकाना स्टेडियममध्ये खेळला गेला. अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या क्षणी लखनऊच्या गोलंदाजांनी मुंबईवर मात केली. हार्दिक पंड्या शेवटपर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न करत होता. पण शेवटच्या ओव्हरमध्ये तो अपयशी ठरला. सामना लखनऊने जिंकला, पण कर्णधार रिषभ पंत आणि गोलंदाज दिग्वेश राठी यांच्यावर कारवाई झाली.

मुंबईचे सलामीवर माघारी परतल्यानंतर नमन धीर आणि सूर्यकुमार यादव मोर्चा सांभाळत होते. आठव्या ओव्हरमध्ये दिग्वेश राठी गोलंदाजी करायला आला आणि ओव्हरच्या पहिल्या बॉलवर त्याने नमन धीरला बोल्ड केले. विकेट घेतल्यानंतर दिग्वेश राठीने नोटबुक सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनमुळे राठीवर बीसीसीआयकडून कारवाई करण्यात आली आहे.

नोटबुक सेलिब्रेशन केल्याने कालच्या सामन्यातील मानधनापैकी ५० टक्के फी दंड म्हणून दिग्वेश राठीला भरावी लागणार आहे. याआधी पंजाबविरुद्धच्या सामन्यामध्ये नोटबुक सेलिब्रेशनमुळे राठीवर कारवाई झाली होती. तरीसुद्धा काल मुंबईच्या नमन धीरची विकेट घेतल्यानंतर दिग्वेशने नोटबुक सेलिब्रेशन केल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. आयपीएल २०२५ मधील एकूण मानधनापैकी मोठी रक्कम दंड भरण्यात जाईल असे नेटकरी म्हणत आहेत.

दिग्वेश राठीच्या नोटबुक सेलिब्रेशनवर अंपायर रिचर्ड केटलबोरो यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. "फायनचं सेलिब्रेशन! पंजाब विरुद्धच्या सामन्यात दिग्वेश राठीला १.८७ लाख रुपयांचा दंड भरावा लागला. मुंबई विरुद्धच्या कालच्या सामन्यात त्याला ३.७५ लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. लखनऊकडून त्याला ३० लाख रुपयांचे मानधन मिळणार आहे. पण नोटबुक सेलिब्रेशनसाठी त्याच्यावर एकूण ५.६२ लाख रुपयांचा दंड बसला आहे." असे ट्वीटमध्ये रिचर्ड केटलबोरो यांनी म्हटले आहे.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -

विल जॅक्स, रेयान रिकल्टन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ड, अश्वनी कुमार, दीपक चहर, विग्नेश पुथुर.

लखनऊ सुपर जायंट्सची प्लेईंग ११ -

एडन माक्ररम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, रिषभ पंत (कर्णधार), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकुर, दिग्वेश राठी, आकाश दीप, आवेश खान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT