Rishabh Pant : पुन्हा तोच पाढा.. सलग चौथ्या सामन्यात रिषभ पंत 'फ्लॉप शो', विकेटनंतर संजीव गोयंकांची 'ती' रिॲक्शन चर्चेत

Rishabh Pant Wicket : सलग चार सामन्यांमध्ये रिषभ पंतने खराब कामगिरी केली आहे. आजच्या मुंबई विरुद्धच्या सामन्यात पंत २ धावा करुन बाद झाला. त्यानंतर संजीव गोयंकांची रिॲक्शन स्टेडियममधील कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली.
Rishabh Pant Wicket
Rishabh Pant Wicketx
Published On

LSG VS MI Live : आयपीएल २०२५ मध्ये रिषभ पंतचा खराब फॉर्म सुरु आहे. आजच्या लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यात लखनऊचा कर्णधार रिषभ पंत २ धावा करुन बाद झाला. सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्येही पंत लवकर बाद होऊन माघारी परतला होता. त्याच्या या खराब कामगिरीची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

मेगा ऑक्शनमध्ये लखनऊने २७ कोटींची बोली लावली आणि पंतला संघात सामील केले. तो आयपीएल २०२५ मधला सर्वात महागडा खेळाडू आहे. पण आयपीएलच्या सुरुवातीलाच रिषभ पंतने अपेक्षाभंग केल्याचे चाहते म्हणत आहेत. तो पहिल्या सामन्यात शून्यावर, दुसऱ्या सामन्यात १५ धावांवर, तिसऱ्या सामन्यात २ धावांवर बाद झाला होता. आजच्या मुंबई विरुद्धच्या सामन्यामध्येही पंत २ धावा करुन तंबूत परतला.

Rishabh Pant Wicket
Rohit Sharma : डग आउटमध्ये बसून रोहितनं प्लान आखला, पुढच्या ओव्हरमध्ये मिचेल मार्शची विकेट; नेमकं काय झालं?

दहाव्या ओव्हरमध्ये रिषभ पंतसमोर हार्दिक पंड्या गोलंदाजी करण्यासाठी आला. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर वाईट शॉट खेळून पंत बाद झाला. त्यानंतर स्टेडियममध्ये बसलेल्या लखनऊ संघाच्या मालक संजीव गोयंका यांची रिॲक्शन कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. सलग चार सामन्यांमध्ये खराब खेळ केल्याने सोशल मीडियावर रिषभ पंतला ट्रोल केले जात आहे.

Rishabh Pant Wicket
IPL 2025 मध्ये खेळण्यासाठी 'या' क्रिकेटपटूने केला हनीमून कॅन्सल, संसार सुरु होण्याआधीच...

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -

विल जॅक्स, रेयान रिकल्टन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ड, अश्वनी कुमार, दीपक चहर, विग्नेश पुथुर.

लखनऊ सुपर जायंट्सची प्लेईंग ११ -

एडन माक्ररम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, रिषभ पंत (कर्णधार), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकुर, दिग्वेश राठी, आकाश दीप, आवेश खान.

Rishabh Pant Wicket
MS Dhoni : दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी CSK मध्ये मोठा उलटफेर; धोनीकडं कर्णधारपद जाण्याची शक्यता, कारण...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com