MS Dhoni Ravindra Jadeja Runout : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या सामन्यामध्ये पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजा यांची मैदानातील केमिस्ट्री पाहायला मिळाली. धोनी आणि जडेजा यांनी मिळून शेवटच्या ओव्हरमध्ये आशुतोष शर्माला रनआउट केले. तो फक्त एक धाव करुन माघारी परतला. याच दरम्यान धोनी-जडेजा यांचा आशुतोष शर्माला रनआउट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
मथीशा पाथिराना शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला. ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर केएल राहुल कॅचआउट झाला. तिसऱ्या बॉलच्या वेळी स्ट्राईकवर आशुतोष शर्मा होता. मथीशा पाथिरानाने बॉल टाकल्यावर आशुतोषने बॅट फिरवली. बॉल जवळच असलेल्या रवींद्र जडेजाकडे गेला. एक धाव पूर्ण करुन दुसरी धाव घेण्यासाठी आशुतोष धावला. तेव्हा जडेजाने जोरात धोनीकडे बॉल थ्रो केला. धोनीने देखील वाऱ्याच्या वेगाने बॉल पकडून आशुतोषला रनआउट केले.
चेपॉक स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याला सुरुवात झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या संघाने २० ओव्हर्समध्ये एकूण १८३ धावा केल्या. सलामीला आलेला केएल राहुल शेवटच्या ओव्हरमध्ये बाद झाला. त्याने सर्वाधिक ७७ धावा केल्या.
चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग ११ -
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, आर. अश्विन, नूर अहमद, मुकेश चौधरी, खलील अहमद, मथीशा पाथिराना.
दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११ -
अक्षर पटेल (कर्णधार), जॅक फ्रेझर मॅकगर्क, केएल राहुल, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.