air india twitter
क्रीडा

Team India News: टीम इंडियाला मायदेशी आणणाऱ्या विमानावरुन उडाला गोंधळ! DGCA ने मागितलं स्पष्टीकरण, नेमकं काय घडलं?

Team India Arrival In India: वर्ल्डकप ट्रॉफीसह भारतीय संघ मायदेशी परतला आहे. दरम्यान ज्या विमानाने भारतीय संघ भारतात दाखल झाला आहे, त्या विमानावरुन DGCA ने स्पष्टीकरण मागितलं आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघ वर्ल्डकप ट्रॉफीसह भारतात दाखल झाला आहे. एअर इंडियाचं विमान भारतीय खेळाडूंना घेऊन दिल्लीत लँड झालं आहे. दरम्यान लँड होताच एअर इंडियाच्या विमनावरून गोंधळ सुरू झाल्याचे पाहायला मिळाले आहे. डीजीसीएने भारतीय संघाला बारबाडोसहून दिल्लीला आणण्यासाठी जे विमान वापरलं गेलं त्याबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे. या विमानाने भारतीय वेळेनुसार बुधवारी दुपारी ३ वाजता अवकाशात झेप घेतली. यासह गुरुवारी सकाळी हे विमान दिल्लीत लँड झालं. बीसीसीआयकडून या स्पेशल चार्टर्ड विमानाची सोय करण्यात आली होती.

डीजीसीएने या विमानाचं स्पष्टीकरण मागितलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार असं म्हटलं जात आहे की, बारबाडोसमध्ये एअर इंडियाचं जे विमान होतं. ते प्रवाशांना न्यूयॉर्कहून दिल्लीला घेऊन जाणार होतं. मात्र अचानक या प्लानमध्ये बदल करण्यात आला. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. त्यामुळेच डीजीसीएने या विमानाची आता रिपोर्ट मागवली आहे.

एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण

पीटीआयच्या वृत्तानुसार, एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बोइंग ७७७ हे विमान बारबाडोसला पाठवल्यामुळे प्रवाशांचे हाल झालेले नाहीत. दिल्लीला जाण्यासाठी तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना आधीच विमान रद्द करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. ज्यांना ही माहिती नाही मिळाली आणि ते विमानतळावर आले, अशा प्रवाशांसाठी खास सोय करण्यात आली होती. या प्रवाशांना न्यूयॉर्कला जाण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर न्यूयॉर्कहून दिल्लीला जाण्याची देखील सोय करण्यात आली.

भारतीय संघ भारतात दाखल

बुधवारी भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता एअर इंडियाचं विमान भारतीय खेळाडूंना घेऊन दिल्लीसाठी रवाना झालं. सकाळी ६-७ च्या दरम्यान हे विमान दिल्लीत दाखल झालं आहे. भारतीय खेळाडू दिल्लीतील ITC Maurya हॉटेलमध्ये थांबणार आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदींसोबत नाश्ता आणि संध्याकाळी ५ वाजता मुंबईत जंगी मिरवणूक काढली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सोलापूरकरांनी कोणाला दिला कौल? विजयाची वैशिष्ट्ये काय?

Sujay Vikhe Patil : जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा कार्यक्रम लावला; संगमनेरमधील विजयानंतर सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

SCROLL FOR NEXT