IND vs ZIM,Live Streaming: जियो किंवा हॉटस्टार नव्हे, तर इथे पाहता येतील भारत- झिम्बाब्वे मालिकेतील सामने LIVE

India vs Zimbabwe, Match Details: भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे सामने कुठे पाहता येणार जाणून घ्या.
IND vs ZIM,Live Streaming: जियो किंवा हॉटस्टार नव्हे, तर इथे पाहता येतील भारत- झिम्बाब्वे मालिकेतील सामने LIVE
ind vs zimyandex

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने घवघवीत यश मिळवलं आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने १७ वर्षांची प्रतीक्षा संपवत जेतेपदाला गवसणी घातली आहे. या विजयानंतर भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. त्यामुळे इथून पुढे युवा खेळाडू आपला जलवा दाखवताना दिसून येणार आहेत. भारतीय संघाने २०२६ मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी तयारी सुरु केली आहे. दरम्यान भारतीय संघ ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेमध्ये दाखल झाला आहे.

भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी शुभमन गिलची भारतीय संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. या मालिकेसाठी यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे आणि संजू सॅमसन यांचा देखील भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

IND vs ZIM,Live Streaming: जियो किंवा हॉटस्टार नव्हे, तर इथे पाहता येतील भारत- झिम्बाब्वे मालिकेतील सामने LIVE
IND-W vs SA-W: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! दक्षिण आफ्रिकेला 10 विकेट्सने लोळवलं

या तिन्ही खेळाडूंनी वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. बारबाडोसमध्ये चक्रीवादळ असल्यामुळे हे खेळाडू झिम्बाब्वेमध्ये जाऊ शकणार नाहीये. त्यामुळे या तिघांची रिप्लेसमेंट म्हणून सुरुवातीच्या २ सामन्यांसाठी जितेश शर्मा, साई सुदर्शन आणि हर्षित राणा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. यासह ध्रुव जुरेल, रियान पराग आणि तुषार देशपांडे यांचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे.

IND vs ZIM,Live Streaming: जियो किंवा हॉटस्टार नव्हे, तर इथे पाहता येतील भारत- झिम्बाब्वे मालिकेतील सामने LIVE
IND vs SA, Final: हार्दिकला विसरून कसं चालेल? आयपीएलचा व्हिलन ते वर्ल्डकपचा हिरो

कुठे पाहता येणार सामने?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला ६ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने हरारेतील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहेत. हे सामने जियो सिनेमा किंवा हॉटस्टारवर नव्हे, तर सोनी स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहेत. जर तुम्ही मोबाईलवर हे सामने पाहत असाल, हे सामने तुम्हाला सोनी लिव्ह अॅपवर लाईव्ह पाहता येतील. हे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४:३० वाजता सुरु होतील.

या मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांसाठी असा आहे भारतीय संघ:

शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हर्षित राणा , आवेश खान, खलील अहमद.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com