Cameron Green bid in IPL 2026 Mini Auction saam tv
Sports

IPL च्या इतिहासातील महागडा परदेशी खेळाडू, २५.२० कोटींची बोलीही लागली, तरीही ग्रीनला का मिळणार फक्त १८ कोटी?

Cameron Green bid in IPL 2026 Mini Auction: IPL 2026 च्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर कॅमेरॉन ग्रीन हा सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. त्याच्यावर तब्बल २५.२० कोटींची बोली लावण्यात आली.

Surabhi Jayashree Jagdish

दुबईतील अबुधाबीमध्ये आयपीएल २०२६ चं मिनी ऑक्शन सुरु आहे. या ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमरून ग्रीनवर पाण्यासारखा पैसा बरसला आहे. कोलकाता नाइट राइडर्सने २५ कोटी २० लाख देत कॅमरून ग्रीनला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. यासोबत तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे. ग्रीन स्टार्कला मागे टाकत सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

कोणी लावली होती ग्रीनवर बोली?

2 कोटींच्या ब्रेस प्राईजवर कॅमरून ग्रीन ऑक्शनमध्ये उतरला होता. त्याच्या २ कोटींच्या बेस प्राईजवर मुंबई इंडियन्सने बोली लगावली होती. यानंतर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये चढाओढ सुरु होती. यामध्ये बिड प्राईड 13.5 पोहोचल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने एन्ट्री घेतली. अखेर कोलकाताने बाजी मारून ग्रीनला विकत घेतलं.

ग्रीनला मिळणार केवळ १८ कोटी?

कॅमरून ग्रीनची आयपीलए २०२६ मध्ये सॅलरी कॅप १८ कोटी आहे. आयपीएलच्या नव्या नियमांनुसार, कोणताही परदेशी खेळाडू मिनी ऑक्शनमध्ये या किमतीपेक्षा जास्त पैसे कमावू शकत नाही. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सने भलेही ₹25.20 कोटींची बोली लावली तरीही कॅमरूनला केवळ १८ कोटी मिळणार आहे. उर्वरित पैसे प्लेअर्स वेलफेअर फंडमध्ये जाणार आहेत.

आयपीएलच्या इतिहासातील टॉप ५ सर्वात महागडे खेळाडू

  • २५.२० कोटी - कॅमेरॉन ग्रीन (केकेआर, २०२६)

  • २४.७५ कोटी - मिचेल स्टार्क (केकेआर, २०२४)

  • २०.५० कोटी - पॅट कमिन्स (SRH, २०२४)

  • १८.५० कोटी - सॅम करन (पीबीकेएस, २०२३)

  • १७.५० कोटी - कॅमेरॉन ग्रीन (एमआय, २०२३)

लिलावात सर्वात महागडा परदेशी खेळाडू

आयपीएलच्या इतिहासात कॅमरून ग्रीन हा सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, हा रेकॉर्ड मिशेल स्टार्कच्या नावावर होता. स्टार्कला २०२४ च्या ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने २४.७५ कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. तर यंदाच्या ऑक्शनमध्ये ग्रीनला कोलकाता नाईट रायडर्सनेही खरेदी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Asta 2025: धन दाता शुक्र होणार अखेर अस्त; या राशींच्या आयुष्यात येणार अडचणी

Maharashtra Politics: अजित पवारांनी मोठा डाव टाकला; एकाच दिवशी भाजप आणि उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का

Mumbai Travel : 2025 ला निरोप अन् नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत, मुंबईकरांनो न्यू इयरला 'या' ठिकाणी नक्की जा

Wednesday Horoscope: नोकरीची समस्या सुटेल, ५ राशींची पैशांची तंगी होईल दूर, वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: शितल तेजवानीला पौड न्यायालयाने 8 दिवसांची पुन्हा पोलीस कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT