Yuvraj Singh Love Life Saam TV
Sports

दीपिका पदुकोण ते प्रीती झिंटा, एक नव्हे ८-८ गर्लफ्रेंड...'या' बॉलिवूड सुंदरींच्या प्रेमात युवराज झाला होता क्लीनबोल्ड

Cricketer Yuvraj Singh News | आज (१२, डिसेंबर) युवराज सिंगचा वाढदिवस. जाणून घेऊया युवराज सिंगच्या या कथित प्रेमप्रकरणांचे रंजक किस्से.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Yuvraj Singh Love Life: भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज म्हणून युवराज सिंगचे नाव घेतले जाते. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत युवराजने जिगरबाज खेळी करत संघाला अनेक विजय मिळवून दिले होते. सहा चेंडूत लगावलेले सहा षटकार असो किंवा विश्वचषकातील अष्टपैलू कामगिरी असो युवराजच्या अनेक खेळी आजही चर्चेत असतात.

यशस्वी क्रिकेटपटू म्हणून युवराजच्या (Yuvraj Singh) नावाची जितकी चर्चा झाली, तितकीच त्याच्या कथित प्रेमप्रकरणांचीही झाली. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत युवराज सिंगचे नाव जोडले गेले होते. आज ( १२, डिसेंबर) युवराज सिंगचा वाढदिवस. जाणून घेऊया युवराज सिंगच्या या कथित प्रेमप्रकरणांचे रंजक किस्से. (List Of Yuvraj Singh Ex-Girlfriends) 

दीपिका पदुकोण

युवराज सिंगच्या वादळी खेळीने २००७ चा विश्वचषक चांगलाच गाजला. या विश्वचषकाचा हिरो ठरलेल्या युवराज सिंगने मालिकावीरचा मानही मिळवला. युवराजच्या या खेळीवर क्रिकेटप्रेमी तर खूश झालेच, परंतु बॉलिवूडची (Bollywood) मस्तानी दीपिका पदुकोणही युवराजच्या प्रेमात पडली होती. या विश्वचषकानंतर दीपिका आणि युवराज यांच्यात जवळीक वाढली. इतकेच नव्हे तर युवराजच्या वाढदिवसाला दीपिकाने मोठी पार्टीही ठेवल्याचे बोलले जात होते. मात्र कालांतराने त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. (Latest Marathi News)

रिया सेन

दीपिकानंतर युवराजच्या आयुष्यात रिया सेन आली. रिया सेन आणि युवराज सिंगच्या प्रेमप्रकरणाचीही त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या त्यावेळी समोर आल्या होत्या.

नेहा धुपिया

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री नेहा धुपियासोबतही युवराज सिंगचे नाव जोडले गेले होते. २०१४ मध्ये सौफी चौधरीच्या बर्थडे पार्टीत एकत्र दिसल्यानंतर ही चर्चा सुरू झाली होती. मात्र अभिनेत्री नेहा धुपियाने या चर्चा खोट्या असल्याचे सांगितले होते. अभिनेत्री प्रिती झेंगियानीसोबतही युवराज सिंगचे नाव जोडले गेले होते. मोहब्बते मालिकेतून प्रिती झेंगियानी सर्वत्र लोकप्रिय ठरली होती.

प्रीती झिंटा

युवराज सिंग आणि प्रिती झिंटाच्या प्रेमप्रकरणाची क्रिकेट विश्वात सर्वाधिक चर्चा झाली होती. आयपीएलमध्ये किंग्स ईलेव्हन पंजाबचा भाग असलेल्या युवराजला अनेकदा प्रिती झिंटासोबत पार्टी करताना माध्यमांनी कॅमेऱ्यात कैद केले होते. इतकेच नव्हे तर त्यांचे किस करतानाचेही अनेक फोटो व्हायरल झाले होते. मात्र दोघांनीही हे आरोप फेटाळले होते.

मनिषा लांबा

युवराज सिंग आणि अभिनेत्री मनिषा लांबा यांचा किस करतानाचा फोटो व्हायरल झाल्याने चांगलीच खळबळ माजली होती. मात्र अभिनेत्रीने हा फोटो तिच्यासारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या मुलीचा असल्याचा खुलासा केला होता.

किमी शर्मा

युवराज सिंग आणि किम शर्मा यांचे प्रेमप्रकरणही चांगलेच गाजले होते. दोघेही एकमेकांना चार वर्षे डेट करत होते. मात्र युवराज सिंगचे हे नातेही शेवटपर्यंत टिकू शकले नाही.

Edited By - Gangappa Pujari

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT