Ramanand Sagar Death Anniversary: सुप्रसिद्ध अध्यात्मिक मालिका निर्माते रामानंद सागर यांची आज पुण्यतिथी आहे. रामानंद सागर आजही रामायणासारखी मालिका निर्माण केल्याने करोडो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करीत आहेत. टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच रामाची कथा रामानंद यांनी जिवंत केली.
रामानंद सागर लेखक, पत्रकार, पटकथा लेखक, संवाद लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक होते. त्यामुळे एकट्या प्रतिभावान व्यक्ती केलेली ही कलाकृती प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. रामानंद सागर यांचे आजच्या दिवशी म्हणजेच १२ डिसेंबर २००५ रोजी निधन झाले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनाशी संबंधित काही गोष्टी जाणून घेऊया.
रामानंद सागर यांचा जन्म 29 डिसेंबर 1917 रोजी लाहोर, पाकिस्तान येथे झाला. त्यांचे बालपणीचे नाव चंद्रमौली चोप्रा होते. रामानंद यांना त्यांच्या आजीने (आईच्या आईने)दत्तक घेतले होते. दत्तक घेतल्यानंतर त्यांना रामानंद हे नवीन नाव देण्यात आले. फाळणीनंतर रामानंद यांचे कुटुंब भारतात आले.
भारतात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रामानंद यांनी लहानपणापासूनच काम करायला सुरुवात केली. सुरूवातीला त्यांनी ट्रक क्लिनर आणि शिपाई म्हणून काम केले.
मुंबईत आल्यावर लेखक म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. करियरच्या सुरूवातीला रामानंद सागर कथा-पटकथा लिहायचे. काही काळातच ते यशाच्या शिखरावर पोहोचले. 1950 साली त्यांनी सागर आर्ट कॉर्पोरेशन ही निर्मिती संस्था सुरू केली. (Mumbai)
रामानंद सागर यांच्या अनेक मालिका आणि चित्रपट प्रसिद्ध झाले. परंतु त्यांच्या रामायण या मालिकेची सर्वाधिक चर्चा झाली. रामायणाचा पहिला भाग २५ जानेवारी १९८७ रोजी प्रसारित झाला. ही मालिका ३१ जुलै १९८८ पर्यंत चालली. रामायण रविवारी सकाळी दूरदर्शनवर ४५ मिनिटे (जाहिरातींसह) प्रसारित होत असे. तर त्या काळात बाकीच्या मालिकांना फक्त ३० मिनिटांचा स्लॉट मिळत असे. (TV)
जेव्हा रामायण प्रसारित होत असे, तेव्हा देशातील रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्ये कर्फ्यूसारखी शांतता असायची. आजच्या युगात याची कल्पनाही करता येत नाही. जवळपास 10 कोटी लोक ही मालिका पाहत असल्याचं सांगण्यात येते. राम-सीतेची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल आणि दीपिका चिकलिया यांची लोक देवाप्रमाणे पूजा करू लागले होते. (Program)
रामानंद सागर यांनी मालिकेतील सर्व पात्रांना वास्तविक जीवनातही त्यांचे आचरण चांगले ठेवण्यास सांगितले होते. जगातील सर्वात जास्त पाहिलेली पौराणिक मालिका म्हणून रेकॉर्ड बुकमध्ये स्थान मिळवले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.