Besharam Rang: दीपिका-शाहरुखने दाखवले 'बेशरम रंग', पठाण चित्रपटातील गाण्यात दिसला कलाकारांचा बोल्ड अवतार

'बेशरम रंग' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Besharam Rang Sang From Upcoming Bollywood Pathaan Has Released
Besharam Rang Sang From Upcoming Bollywood Pathaan Has ReleasedInstagram @iamsrk #deepikapadukone

Pathaan Movie Song Released: बॉलिवूडमध्ये सध्या चर्चा आहे ती शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' या चित्रपटाची. या चित्रपटामध्ये शाहरुखसह दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहाम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

Besharam Rang Sang From Upcoming Bollywood Pathaan Has Released
Riteish Deshmukh: रितेशचं वेडNess, चाहत्यांच्या गराड्यात घेतला ढोल वाजविण्याचा आनंद

'पठाण' चित्रपटाची जशी चर्चा आहे. तशीच चर्चा या चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्याची सुद्धा चर्चा आहे. शाहरुख आणि दीपिका यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून गाणे कधी प्रदर्शित होणार हे संगितले होते. या पोस्टच्या माध्यमातून दीपिकाने तिच्या चित्रपटातील फर्स्ट लूक देखील चाहत्यांसमोर रिव्हिल केला आहे. दीपिकाच आहे लूक आतापर्यंतचा सर्वात बोल्ड लूक असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचे म्हणणे आहे. शाहरुख खानने देखील हे गाणे केव्हा प्रदर्शित होणार यासाठी केलेल्या पोस्टमध्ये कविता करत दीपिकाला ग्लॅमरस म्हटले आहे. (Deepika Padukone)

'बेशरम रंग' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याची सुरूवात 'हमे तो लूट लिया मिलके इश्कवालोने' अशी होत आहे. या संपूर्ण गाण्यात दीपिका वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. परंतु तिचे हे सर्व लूकसाठी वेगेवेगळ्या बिकिनी वापरण्यात आल्या आहेत. दीपिकाचा या गाण्यातील होत तसेच बोल्ड अवतार आपण याआधी कधीही पाहिला नसेल.

या गाण्यात शाहरुखविषयी बोलायचे झाले तर त्याचे फारच कमी शॉट या गाण्यात आहेत. दीपिका त्याच्याकडे पाहत आणि त्याला उद्देशून हे गाणं म्हणताना दाखवली आहे. शाहरुख या गाण्यामध्ये टॉपलेस दाखविण्यात आला आहे. तसेच दोघांनी ही एकत्र भन्नाट डान्स मूव्हज केले आहेत. (Shah Rukh Khan)

पठाण चित्रपट २५ जानेवारी, २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख ५ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण करताना दिसत आहे. हा चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com