आयपीएल २०२५ मधील ३२ वा सामना काल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. दिल्ली गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांना वेळीच रोखले आणि सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला. सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. मिचेल स्टार्कने दिल्लीकडून सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर अंपायर्सनी नो-बॉल अशी घोषणा केली. चाहत्यांच्या मते, स्टार्क आणि दिल्लीच्या विरोधात पंचांनी निकाल दिला. त्यावरुन सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या आहेत.
सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने प्रथम गोलंदाजी केली. मिचेल स्टार्कने टाकलेल्या पहिल्या ३ बॉल्सवर शिमरॉन हेटमायरने ५ धावा केल्या होत्या. चौथ्या बॉलच्या वेळेस रियान पराग स्ट्राईकवर होता. स्टार्कने राउंड द विकेट जाऊन बॉल टाकला. त्यावर रियानने चौकार मारला. पण थर्ड अंपायरने नो-बॉलचा सिग्नल दिला. स्टार्कचा पाय क्रीज लाईन ओलांडत नव्हता, तरीही नो-बॉल देण्यात आला. यावरुन वाद निर्माण झाला.
अंपायर्सनी नो-बॉलची घोषणा का केली?
थर्ड अंपायरने स्टार्कच्या बॅकफुट (मागच्या पायावरुन) नो-बॉलची घोषणा केली. स्टार्कचा मागचा पाय रिटर्न क्रीजच्या लाईनला स्पर्श करत होता. नियमांनुसार, नो-बॉल देण्यात आला. यावर कॉमेंट्री बॉक्समध्ये चर्चा झाली. एमसीसीचा (मॅरीलिबोन क्रिकेट क्लब) नियम क्रमांक 25.5.1 अनुसार, जर गोलंदाजाचा मागचा पाय रिटर्न क्रीज ओलांडत असेल किंवा पायाचा क्रीजला स्पर्श देखील होत असेल तर त्याला नो-बॉल म्हटले जाईल. स्टार्कच्या नो-बॉलचा इतका फरक पडला नाही. पुढच्याच बॉलवर रियान परागची विकेट पडली.
दिल्लीने प्रथम फलंदाजी करत १८८ धावा केल्या होत्या. त्यानंतर राजस्थानसमोर १८९ धावांचे आव्हान होते. पण दिल्लीने राजस्थानला १८८ धावांवर रोखले. त्यानंतर आयपीएल २०२५ ची पहिली सुपर ओव्हर खेळली गेली. सुपर ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सने ११ धावा केल्या. त्यानंतर दिल्लीने १३ धावा करुन सुपर ओव्हर आणि कालचा सामना जिंकला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.