DC vs RR IPL 2024 Delhi Capitals vs Rajasthan Royals playing XI Prediction facebook
Sports

DC vs RR Playing 11 Prediction: सामन्याआधीच राजस्थानचं टेन्शन वाढलं! दिल्लीच्या या स्टार खेळाडूंचं होणार कमबॅक, पाहा प्लेइंग ११

IPL 2024 News | Delhi Capitals vs Rajasthan Royals Playing XI Prediction: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यासाठी कशी असेल प्लेइंग ११? जाणून घ्या.

Ankush Dhavre

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना प्लेऑफमध्ये जाण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. राजस्थान रॉयल्सने ८ सामने जिंकले असून १६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर दिल्लीचा संघ १० गुणांसह सहाव्या स्थानी आहे. दिल्लीला प्लेऑफच्या शर्यतीत टीकून राहण्यासाठी आणि राजस्थानला नंबर १ वर जाण्यासाठी आजचा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपल्या मजबूत प्लेइंग ११ सह मैदानात उतरु शकतात.

दिल्लीची प्लेइंग ११ बदलणार?

या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघात बदल केला जाऊ शकतो. गेल्या काही सामन्यांमध्ये डेव्हिड वॉर्नर खेळताना दिसून आला नव्हता. मात्र तो आता फिट झाला असून त्याचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो.

इशांत शर्माला संधी मिळणार?

दिल्ली कॅपिटल्स संघातील अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा देखील गेल्या काही सामन्यांमध्ये खेळताना दिसून आला नव्हता. मात्र तो देखील आता फिट झाला आहे. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरसह इशांत शर्माचा देखील प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो.

तर राजस्थान रॉयल्स संघाबद्दल बोलायचं झालं, तर प्लेइंग ११ मध्ये ट्रेन्ट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान आणि आर अश्विन यांचा समावेश केला जाऊ शकतो. तर युझवेंद्र चहलचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून समावेश केला जाऊ शकतो.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११...

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals Playing 11):

डेव्हिड वॉर्नर, अभिषेक पॉरेल, जॅक फ्रेजर मॅकगर्क, रिषभ पंत( कर्णधार, यष्टीरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा, मुकेश यादव

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals Playing 11):

यशस्वी जयस्वाल, रियान पराग,जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार, यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, रोवमेन पॉवेल, आर अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT