DC vs RCB Match Result
DC vs RCB Match Result saam tv
क्रीडा | IPL

DC vs RCB Match Result: दिल्लीच्या 'सॉल्ट'ने बिघडवली आरसीबीची चव! विराटच्या अर्धशतकावर फिरवलं पाणी

Chandrakant Jagtap

RCB vs DC Live Score : आयपीएलच्या 16 व्या हंगामाचा 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेन्जर्स बेंगळूरू या दोन संघात झाला. या सामन्यात दिल्लीने आरसीबीचा 6 विकेट आणि 20 चेंडू राखून पराभव केला. फिल्प सॉल्टने दिल्लीकडून धमाकेदार खेळी केली. त्याने 45 चेंडूत 87 धावां कुटल्या. त्याच्या खेळीने आरसीबीची विजयाची चव बिघडवली.

दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने दिल्लीला 182 धावांचं लक्ष्य दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने दमाकेदार सुरुवात केली. वॉर्नर आणि सॉल्टने मिळून पहिल्या पाच षटकातच 60 धावांचा आकडा पार केला. मात्र हेजलवूडने वॉर्नरला बाद करून ही जोडी फोडली. वॉर्नर 14 चेंडूत 22 धावा करून बाद झाला.

त्यानतंर मिशेल मार्श 17 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. मात्र फिल्प शॉल्टने एका रिले रुसोच्या मदतीने आरसीबीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. सॉल्ट शतक ठोकेल असे वाटत असतानाच कर्ण शर्माच्या चेंडूचा तो शिकार ठरला.

त्याने 45 चेंडूत 87 धावांची दमदार खेळी केली, यात 8 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. शेवटी रुसोने जोरदार फटकेबाजी करत 16.4 षटकातंच दिल्लीला विजय मिळवून दिला. (IPL 2023)

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने निर्धारित 20 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात 181 धावा केल्या. आरसीबीकडून विराटने सर्वाधिक 55 धावा केल्या, तर त्याला महिपाल लोमरोरने 29 चेंडूत 54 धावा करत उत्तम साथ दिली. याशिवाय आरसीबीकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने 45 धावा चोपल्या. दिल्लीकडून मिशेल मार्शने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. (Latest Sports News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nigeria Bomb Blast: प्रॉपर्टीच्या वादातून प्रार्थनास्थळात बॉम्बस्फोट; ८ जणांचा मृत्यू, १६ जखमी

Mumbai Lok Sabha: मुंबईत आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; शिवाजी पार्कवर PM मोदी अन् राज ठाकरे, तर बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

Daily Horoscope: कष्टाला पर्याय नाही, 'या' ३ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार; तुमच्या राशीत काय?

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

SCROLL FOR NEXT