CSK vs MI Match Result: चेन्नई एक्सप्रेस सुसाट! मुंबईवर मिळवला दमदार विजय, गुणतालिकेत मोठा उलटफेर

Chennai Super Kings Vs Mumbai Indians Match Result महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सवर ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.
IPL2023 CSK Vs MI Match Result Devon Conway Best Batting Chennai Super Kings Beat Mumbai Indians by 6 Wicket
IPL2023 CSK Vs MI Match Result Devon Conway Best Batting Chennai Super Kings Beat Mumbai Indians by 6 Wicket Twitter
Published On

 Chennai Super Kings Vs Mumbai Indians Match Result: सलामीवीर डेवॉन कॉनवेची धमाकेदार खेळी, त्याला ऋतुराज गायकवाडने दिलेली चांगली साथ आणि शेवटच्या काही षटकात शिवम दुबेने केलेल्या जोरदार फटकेबाजीच्या जोरावर महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सवर १४ चेंडू आणि ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. सलग दोन पराभवानंतर चेन्नईने पुन्हा विजयाचा ट्रॅक पकडला. या विजयासह त्यांनी गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. (Latest sports updates)

IPL2023 CSK Vs MI Match Result Devon Conway Best Batting Chennai Super Kings Beat Mumbai Indians by 6 Wicket
Kohli vs Gambhir Fight: गौतम गंभीरशी वादानंतर विराट कोहलीने बीसीसीआयला केला मेल, लिहिले...

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईसमोर विजयासाठी १४० धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने धमाकेदार सुरूवात केली. सलामीवर ऋतुराज गायकवाडने पावर प्लेमध्ये मुंबईच्या गोलंदाजांवर आक्रमण केलं. त्याला डेवॉन कॉनवेची चांगली साथ लाभली.

दोघांनी मिळून ४.१ षटकातच ४६ धावांची भागीदारी केली. ऋतुराज आज चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. तो मोठी खेळी करेल असं वाटत असताना, रोहित शर्माने पियुष चावलाकडे चेंडू सोपावला. चावलाला मोठा फटका मारण्याच्या नादात गायकवाड बाद झाला. त्याने १६ चेंडूत ३० धावांची तुफानी खेळी केली. यात ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

गायकवाड बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे मैदानावर आला. त्याने कॉनवेच्या मदतीने चेन्नईचा स्कोअरबोर्ड हलता ठेवला. मात्र, तो सुद्धा पियूष चावलाच्या गोलंदाजीवर बाद झाला. रहाणेने १७ चेंडूत २१ धावांची खेळी केली. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या रायडूलाही क्रिस्टन स्ट्रबने झटपट माघारी पाठवलं.

रायडू बाद झाल्यानंतर शिवम दुबे मैदानावर आला. त्याने दुसऱ्या चेंडूपासूनच मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. दुबे आणि कॉनवेने चेन्नईला विजयाजवळ नेलं. चेन्नईला विजयासाठी अवघ्या काही धावांची गरज असताना कॉनवे बाद झाला. कॉनवेने ४२ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. यात ४ चौकारांचा समावेश होता. अखेरच्या काही षटकात महेंद्रसिंग धोनी मैदानावर उतरला. पण शिवम दुबेने षटकार ठोकत चेन्नईला विजय मिळवून दिला.

तत्पुर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मुंबईने निर्धारित २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात १३९ धावा केल्या. मुंबईकडून  नेहाल वढेरा याने दमदार फलंदाजी केली. नेहाल वढेरा याने अर्धशतकी खेळी केली.

वढेरा याने ५१ चेंडूत ६४ धावांचे योगदान दिले. यामध्ये १ षटकार आणि ८ चौकार लगावले. तर सूर्यकुमार यादवने २६ धावांची खेळी केली. चेन्नईकडून पथीराणा याने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर दीपक चहर आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. याशिवाय रविंद्र जाडेजाने एका फलंदाजाला माघारी पाठवलं.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com