Virat Kohli vs Gautam Gambhir Dispute : आयपीएलच्या 43व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचे मार्गदर्शक गौतम गंभीर (Gautam Gambhir) एकमेकांशी भिडले होती. यावेळी दोघांमध्ये प्रचंड राडा झाला. या सामन्यादरम्यान विराट कोहलीचा (Virat Kohli) नवीन-उल-हकसोबत वाद झाला होता. हा वाद अजून संपलेला नाही. 5 दिवसांच्या या लढतीनंतर कोहलीने बीसीसीआयला (BCCI) पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे. तसेच त्यांने नवीन-उल-हकची तक्रारही केली आहे.
विराट कोहलीने मेलमध्ये काय म्हटले?
दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, वादानंतर 5 दिवसांनी विराट कोहलीने बीसीसीआयला पत्र लिहून स्पष्टीकरण दिले आहे. या वादात आपली चूक नसल्याचे त्याने म्हटले. विराटने म्हटले की, त्या दिवशी नवीन-उल-हक आणि गौतम गंभीर यांच्यासोबत झालेल्या वादात मी त्यांना काहीही चुकीचे म्हणालेलो नाही. याच मेलमध्ये किंग कोहलीनेही नवीन-उल-हकची तक्रारही केली आहे.
दरम्यान या वादानंतर बीसीसीआयने विराट कोहली आणि गौतम गंभीर यांना त्यांच्या मॅच फीच्या 100 टक्के आणि नवीन-उल-हकला 50 टक्के दंड ठोठावला होता. त्यामुळे कोहलीला 1 कोटी 7 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बीसीसीआयच्या या कारवाईनंतर कोहलीने या संदर्भात पत्र लिहून आपली बाजू स्पष्ट केली आहे.
त्या सामन्यात नेमकं काय झालं?
या सामन्यात बेंगळुरू संघाने लखनऊला विजयासाठी 127 धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु प्रत्युत्तरात केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ संघ केवळ 108 धावांवरच गारद झाला. त्यामुळे हा सामना आरसीबीने जिंकला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू मैदानात हस्तांदोलन करत होते.
यावेळी विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात एका गोष्टीवरून शाब्दिक चकमक झाली. यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी गंभीर आणि कोहलीला शांत करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी त्यांना एकमेकांजवळ जाण्यापासून रोखले. परंतु संतप्त गौतम गंभीर विराट कोहलीजवळ गेला आणि दोघांमध्ये जोरदार वाद झाला. (Latest Sports News)
याआधी 2013 मध्येही झाला होता वाद
याआधी 2013 मध्येही आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी गंभीर केकेआरचा कर्णधार होता तर विराट कोहली सुपरस्टार होण्याच्या मार्गावर होता. गंभीर आजही तितकाच आक्रमक आहे आणि तो टीव्ही एक्स्पर्टही आहे. याशिवाय लखनऊ संघाचा मार्गदर्शक आहे. कोहली हा आरसीबीचा प्रमुख खेळाडू असला तरी फाफ डू प्लेसिस हा बेंगळुरूचा कर्णधार आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.