Mustafizur Rahman: RCB विरुद्धच्या सामन्यापूर्वीच दिल्लीला मोठा धक्का! संघातील 'स्पीडगन' ने स्पर्धेतून घेतली माघार

Mustafizur Rahman Ruled Out: या सामन्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे
Mustafizur Rahman Ruled Out
Mustafizur Rahman Ruled Outsaam tv
Published On

DC VS RCB: प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आज दिल्लीचा संघ मैदानात उतरणार आहे. अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

या सामन्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाजाने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Mustafizur Rahman Ruled Out
Cheteshwar Pujara: पुजारा म्हणजे शंभर नंबरी सोनं! IPL ला लाथ मारत पठ्ठा गाजवतोय इंग्लंडचं मैदान

दिल्ली कॅपिटल्स संघातील वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने आयपीएल सोडून माघारी परतण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. येत्या काही दिवसात बांगलादेश आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिका पार पडणार आहे.

या मालिकेची तयारी करण्यासाठी त्याने आयपीएलला टाटा बाय बाय केलं आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात असलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी या वेगवान गोलंदाजाचे आभार मानले आहेत.

तसेच आयर्लंड विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. (Latest sports update)

Mustafizur Rahman Ruled Out
IPL Mystery Girl: ती होती हजर अन् कॅमेरामनची पडली नजर! जुही सोबत दिसलेली ‘मिस्ट्री गर्ल’ आहे तरी कोण?

मुस्तफिजुर रहमानच्या जाण्याने दिल्ली संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण येणारा प्रत्येक सामना हा दिल्ली संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. जर एकही सामना गमावला तर दिल्लीचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणार आहे.

तसेच मुस्तफिजुर रहमानच्या कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर, या हंगामात तो २ सामन्यांमध्ये खेळताना दिसून आला आहे. यादरम्यान त्याने १ विकेट मिळवली आहे.

Mustafizur Rahman Ruled Out
Yuvraj Singh On IPL Fight: 'थंड घ्या भावांनो..', विराट - गंभीर वादात आता सिक्सर किंगची उडी,म्हणाला...

ईशांत - नॉर्खियावर असेल जबाबदारी..

मुस्तफिजुर रहमानच्या अनुपस्थितीत ईशांत शर्मा आणि नॉर्खियावर मोठी जबाबदारी असणार आहे. या जोडीने आपल्या संघाला विकेट्स मिळवून देणं खूप गरजेचं आहे. ईशांत शर्माने या हंगामात अप्रतिम गोलंदाजी केली आहे.

या हंगामात गोलंदाजी करताना एकही षटकार न मारू देणारा तो एकमेव गोलंदाज आहे. ईशांत शर्माच्या गोलंदाजीच्या जिवावर दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या मागच्या सामन्यात विजय मिळवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com