IPL 2023 CSK vs MI: धोनीचा मास्टरप्लॅन अन् रोहित भोपळाही न फोडता आऊट, हिटमॅनने केला 'हा' नकोसा रेकॉर्ड; पाहा VIDEO

Chennai Super Kings vs Mumbai Indians: CSK ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
MI Vs CSK
MI Vs CSKSaamtv
Published On

Chennai Super Kings vs Mumbai Indians: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ४९ वा सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नईचं नेतृत्व करणारा एम एस धोनी आमनेसामने आहेत. CSK ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

चेन्नईने संघात कोणताच बदल केलेला नसला तरी मुंबईने कुमार कार्तिकेया व तिलक वर्मा यांना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवले आहे. राघव आज पदार्पण करतोय, तर त्रिस्ताना स्तब्सला संधी मिळाली आहे. (Latest Marathi News)

MI Vs CSK
Kohli vs Gambhir Fight: गौतम गंभीरशी वादानंतर विराट कोहलीने बीसीसीआयला केला मेल, लिहिले...

चेन्नईच्या गोलंदाजापुढे मुंबईची दाणादाण...

सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजीपुढे मुंबईचे सलामीचे फलंदाज चांगलेच ढेपाळल्याचे पाहायला मिळाले. चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दिपक चहर आणि तुषार देशपांडेनं पॉवर प्ले मध्ये मुंबईच्या तीन फलंदाजांना बाद केलं. दिपकने कर्णधार रोहित शर्माला शून्यावर झेलबाद केलं. तसंच सलामीवीर फलंदाज कॅमरून ग्रीनला ६ धावांवर क्लीन बोल्ड केलं, तिसऱ्या षटकात दिपक चहरच्या गोलंदाजीवर ईशान किशन ७ धावांवर बाद झाला.

MI Vs CSK
KL Rahul Replacement: LSG संघाची ताकद तिपटीने वाढणार! KL Rahul च्या जागी ट्रिपल सेंच्युरी मारणाऱ्या फलंदाजाला संधी

रोहितने सलामीला आज इशान किशनसह कॅमेरून ग्रीनला मैदानावर पाठवले अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. रोहित २०१८ साली दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता आणि ६२ इनिंग्जनंतर आज तो सलामीला खेळत नाही. कॅमेरून ग्रीनला प्रमोशन देऊन फार फायदा झालेला नाही.

महेंद्रसिंग धोनी हेल्मेट घालून किपींगला पुढे उभा राहिला अन् त्यामुळे रोहितवर दडपण आले. त्यामुळेच त्याच्या हातून चुकीचा फटका मारला गेला अन् तो भोपळ्यावर बाद झाला. त्याचा फटकाही इतका खराब होता की, तो पाहून सर्वच चकित झाल्याचे पाहायला मिळाले.

नावावर झाला नकोसा विक्रम...

यासोबतच आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा 0 धावांवर बाद होण्याचा नकोसा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. एवढेच नाही तर तो आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा बाद होणारा कर्णधार बनला आहे. कर्णधार म्हणून रोहित ११व्यांदा शून्यावर बाद झाला. त्याने गौतम गंभीरला (10) मागे सोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com