DC VS MI Viral Video X
Sports

DC VS MI : तिकीट का पैसा वसूल! चालू सामन्यात चाहत्यांमध्ये तुफान राडा, एकटी महिला अख्ख्यांना पुरून उरली

DC VS MI IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि करुण नायर यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. मैदानात राडा सुरु असताना मैदानाबाहेर स्टेडियमवरदेखील हाणामारी झाल्याचे समोर आले आहे.

Yash Shirke

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये काल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना रंगला. अटीतटीच्या सामन्यात शेवटपर्यंत मुंबई जिंकेल की दिल्ली हे सांगणे अशक्य होते. सलग तीन रनआउट्सच्या जोरावर कालचा सामना मुंबईने जिंकला आणि अपराजित दिल्लीला त्यांच्याच घरात पछाडले. विजयासह मुंबईने पॉईंट्स टेबलवर मोठी झेप घेतली.

दिल्ली-मुंबई सामन्यादरम्यान करुण नायरने कमबॅक केले. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या करुण नायरने २२२.५० च्या स्ट्राईक रेटने ४० बॉल्समध्ये ८९ धावा केल्या. मुंबईचा हुकमी इक्का असलेल्या जसप्रीत बुमराहची त्याने धुलाई केली. सामन्यादरम्यान करुण नायर आणि जसप्रीत बुमराह यांच्यात गरमागरमी झाल्याचेदेखील पाहायला मिळाले.

करुण नायर- जसप्रीत बुमराह यांच्या राड्याव्यतिरिक्त कालच्या सामन्यातील आणखी एका राड्याची चर्चा पाहायला मिळत आहे. अरुण जेटली स्टेडियममध्ये सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाली. एक महिला आणि पुरुष यांच्यात तुफान मारामारी झाली. भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आलेल्या लोकांमुळे वाद चिघळला. सुरक्षारक्षक आल्यानंतर मारामारी थांबली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून मारामारीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. व्हिडीओ पाहून एका चाहत्याने 'तिकीट का पैसा वसूल!' अशी कमेंट केली आहे.

आयपीएल २०२५ मध्ये कालच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्स पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचे म्हटले जात आहे. दिल्ली विरुद्ध मुंबई महामुकाबल्यामध्ये मुंबईचा सांघिक खेळ पाहायला मिळाला. हा आयपीएलमधला मुंबईचा दुसरा विजय असला तरीही, या विजयामुळे पॉईंट्स टेबलवर नवव्या क्रमावरुन उडी मारुन मुंबईचा संघ सातव्या स्थानावर पोहोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT