DC vs KKR IPL 2024 Delhi capitals captain rishabh pant made big blunder against kolkata knight riders watch video  twitter
Sports

DC vs KKR, IPL 2024: रिषभचं हे चुकलंच राव..! या एका चुकीमुळे दिल्लीच्या हातून सामना निसटला

Rishabh Pant Big Blunder: या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला १०६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या सामन्यात रिषभ पंतने एक मोठी चूक केली, जी दिल्ली कॅपिटल्सला महागात पडली आहे.

Ankush Dhavre

Rishabh Pant Blunder Against KKR:

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघामध्ये झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला एकतर्फी पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाने १०६ धावांनी गमावला आहे. या सामन्यात कर्णधार रिषभ पंतने एक मोठी चूक केली, जी दिल्ली कॅपिटल्स संघाला भलतीच महागात पडली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

रिषभ पंतकडून मोठी चूक..

तर झाले असे की, कोलकाता नाईट रायडर्स संघाची फलंदाजी सुरू असताना चौथ्या षटकात सुनील नरेन बाद झाला होता. चेंडू त्याच्या बॅटचा कडा घेत रिषभ पंतच्या हातात गेला. मात्र त्याने DRS घेतलाच नाही. मुख्य बाब म्हणजे सुनील नरेन तेव्हा केवळ २४ धावांवर फलंदाजी करत होता. त्यानंतर काय झालं हे सर्वांनीच पाहिलं.

दिल्ली कॅपिटल्स संघाकडून चौथे षटक टाकण्यासाठी ईशांत शर्मा गोलंदाजीला आला होता. त्याच्या सुरुवातीच्या ३ चेंडूवर सुनील नरेनने प्रहार करत ६,६ आणि चौकार मारला. त्यानंतर पुढील चेंडूवर देखील त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटची कडा घेत यष्टिरक्षक रिषभ पंतकडे गेला. (Cricket news in marathi)

सुनील नरेन बाद झालाच होता मात्र DRS न घेतल्याने त्याला जीवदान मिळालं. ज्यावेळी चेंडू रिषभ पंतकडे गेला. त्यावेळी कव्हर्सला क्षेत्ररक्षण करत असलेल्या मिचेल मार्शला जाणवलं होतं. त्याने रिषभला DRS घेण्याचा इशारा केला होता. सुरुवातीला त्याने काही इशारा केला नाही आणि जेव्हा इशारा केला त्यावेळी वेळ निघून गेली होती. जर रिषभ पंतने वेळीच DRS घेतला असता, तर सुनील नरेन २४ धावांवर बाद होऊन माघारी परतला असता. असं झालं असतं तर कोलकाताचा संघ धावांचं इतकं मोठं आव्हान उभारु शकला नसता.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रमथ फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून फलंदाजी करताना सुनील नरेनने ३९ चेंडूत ८५ धावांची खेळी केली. तर अंगक्रिश रघुवंशीने २७ चेंडूंचा सामना करत ५४ धावा चोपल्या. या तुफानी खेळीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटकअखेर २७२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाला १६६ धावा करता आल्या. दिल्लीचा संघ या सामन्यात विजय मिळवण्यापासून १०६ धावा दूर राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नमो भारत एक्स्प्रेसमध्ये शरीरसंबंध ठेवले, आता अंगाशी येणार; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरूण-तरुणीवर गुन्हा

Mobile Ban: महिलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी; १५ गावातील ग्रामपंचायतींचा तालिबानी आदेश

Maharashtra Live News Update: कणकवलीचे नवे नगराध्यक्ष संदेश पारकरांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट , चर्चांना उधाण

WPL 2026: छोटा पॅकेट, बडा धमाका! वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या फलंदाजाला दिल्ली कॅपिटल्सनं केलं कॅप्टन

Wednesday Horoscope : शांतपणे आपला पल्ला गाठाल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात बुधवारी चांगल्या गोष्टी घडणार

SCROLL FOR NEXT