David Miller last over mistake DC
Sports

DC vs GT Highlights : राहुलची ९२ धावांची खेळी व्यर्थ, गुजरातचा फक्त एका धावेनं विजय, हिरो मिलर ठरला विलन

David Miller last over mistake, DC vs GT सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा एका धावेने पराभव केला. केएल राहुलची ९२ धावांची खेळी व्यर्थ ठरली, तर डेविड मिलरच्या शेवटच्या षटकातील चुकीमुळे सामना हातातून गेला.

Namdeo Kumbhar

DC vs GT scorecard : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरातने दिल्लीचा एका धावेनं पराभव केला. अखेरच्या २ चेंडूवर २ धावांची गरज होती, पण डेविड मिलरच्या चुकीमुळे दिल्लीने सामना गमावला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत दिल्लीला विजयासाठी २११ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तर दाखल दिल्लीचा संघ ८ विकेटच्या मोबदल्यात फक्त २०९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. थरारक सामन्यात दिल्लीकडून सलामी फलंदाज केएल राहुल याने ९२ धावांची शानदार खेळी केली. तर गुजरातकडून राशिद खान याने ३ विकेट घेतल्या तर प्रसिद्ध कृष्णा याने २ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

राजधानी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेला रोमांचक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. या सामन्यात गुजरातने दिल्लीचा १ धावेने पराभव केला. दिल्लीला विजयासाठी शेवटच्या २ चेंडूंवर फक्त २ धावांची गरज होती. फटकेबाजी करणारा डेविड मिलर मैदानात होता. मात्र प्रसिद्ध कृष्णाने सलग दोन चेंडू निर्धाव टाकले. पाचव्या चेंडूवर धाव घेण्याची संधी असतानाही मिलरने सिंगल घेण्यास नकार दिला. हीच चूक दिल्लीला महागात पडली. मिलरने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली असत तर सामना बरोबरीत सुटला असता.

मिलरने आपल्या फटकेबाजीने दिल्लीला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते. पण शेवटच्या क्षणी सिंगल न घेतल्यामुळे तो 'हिरो' ठरण्याऐवजी पराभवाचा कारणीभूत ठरला. १९ व्या षटकात मोहम्मद सिराजने २३ धावा दिल्या होत्या. या षटकात मिलरने चौकार आणि षटकार मारत २३ धावा वसूल केल्या होत्या. त्यामुळे दिल्लीला विजयासाठी शेवटच्या षटकात फक्त १३ धावा हव्या होत्या. सामना दिल्लीच्या बाजूने झुकला होता. पण अखेरच्या षटकात कृष्णाने भेदक मारा केला. ६ चेंडूत विजयासाठी १३ धावा हव्या असताना प्रसिद्ध कृष्णाने टिच्चून गोलंदाजी केली आणि गुजरातला १ धावेनं विजय मिळवून दिला.

गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ विकेटच्या मोबदल्यात २१० धावांपर्यंत मजल मारली होती. गुजरातकडून कर्णधार शुभमन गिल याने ४५ चेंडूत ७० धावांची खेळी केली. जर जोस बटलर याने २७ चेंडूत ५२ धावा चोपल्या. तर वॉशिंग्टन सुंदर याने ३२ चेंडूत ५५ धावांचे योगदान दिले. गुजरातने दिलेल्या २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने विस्फोटक सुरूवात केली. पथुम निसंका याने २४ चेंडूत ४१ धावांचा पाऊस पाडला. केएल राहुल याने ५२ चेंडूत ९२ धावांची विस्फोटक खेळी केली. तर डेव्हिड मिलर याने २० चेंडूत ४१ धावांची शानदार खेळी केली. पण मिलरला शेवटच्या २ चेंडूवर २ धावा काढता आल्या नाहीत, त्यामुळे गुजरातने एका धावेने सामना जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran-US War: अखेर इराण-अमेरिका युद्ध थांबलं? युद्धविरामाची इनसाईड स्टोरी

Mumbai Crime: 122 कोटींच्या बँक घोटाळ्यात ED ची मोठी कारवाई; 16.95 कोटींची मालमत्ता जप्त

इस्रायलकडून बेरूतवर भीषण बॉम्ब हल्ला,११२ जण ठार आणि ८०० हून अधिक जण जखमी

भाजप आमदाराची बिल्डरला जीवे मारण्याची धमकी; खुद्द सुपारी घेणाऱ्या गुंडाचं पोलिसांना पत्र

धावत्या ट्रेनमध्ये तरुणीसमोर अश्लील चाळे; व्हिडिओ शूट होत असतानाही थांबला नाही, विकृत कृत्य कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT