धावत्या ट्रेनमध्ये तरुणीसमोर अश्लील चाळे; व्हिडिओ शूट होत असतानाही थांबला नाही, विकृत कृत्य कॅमेऱ्यात कैद

train harassment video : धावत्या ट्रेनमध्ये तरुणीसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, आरोपीवर कडक कारवाईची मागणी.
Crime News Update
Crime News Update@vtcyj5
Published On

Shameless Man In Train : धावत्या ट्रेनमध्ये तरूणीसमोर एका तरूणाने अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बॅग समोर ठेवून तरूणाने तरूणीकडे पाहून विकृत चाळे केल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले. बोगीमधील इतर प्रवासी पाहत असतानाही तरूण थांबला नाही. हा घाणेरडा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. धक्कादायक म्हणजे, सोशल मिडिया हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. (man doing obscene act in train viral)

त्या व्यक्तीचा अत्यंत संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेल्वेच्या स्लीपर डब्यात प्रवास करताना एका व्यक्तीने समोर बसलेल्या तरुणीकडे बघून अत्यंत घाणेरडे आणि अश्लील चाळे केले. हा माणूस साईड लोअर बर्थवर मांडी घालून बसला होता. त्याने स्वतःच्या पायावर बॅग ठेवली होती. त्या बॅगेच्या आडोशाने तो घाणेरडे कृत्य करत होता. त्याचे हे वागणे कोणाच्या लक्षात येणार नाही, असे त्याला वाटले. मात्र समोर बसलेल्या तरुणीने त्याचे हे कृत्य ओळखले आणि भीती न बाळगता त्याचा व्हिडिओ बनवला.

man doing obscene act in train viral
man doing obscene act in train viral

त्या तरुणीने व्हिडिओ शेअर केला. अशा लोकांना कुणी नोटीस करणार नाही असे वाटते. पण समाजासमोर त्यांचा खरा चेहरा आणणे आहे. ही केवळ एक साधी चूक नसून जाणीवपूर्वक केलेला छळ आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना महिलांना अशा प्रसंगांचा सामना करावा लागतो, ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला.

Crime News Update
Nashik : खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एक कांड, नामांकित कंपनीत महिलांवर लैंगिक अत्याचार अन्...
man doing obscene act in train viral
man doing obscene act in train viral

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी त्याला मानसिक रोगी म्हटले. अशा विकृत लोकांमुळे समाज असुरक्षित होत असल्याची भावना काहींनी व्यक्त केली. अशा लोकांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, जेणेकरून इतरांना धडा मिळेल, अशी मागणीही एका युजर्सने केली.

Crime News Update
पुणे हादरले! मुलाची हत्या केली अन् बॅगमध्ये भरलं; दगड बांधून विहिरीत फेकलं, तिसऱ्या लग्नासाठी आई झाली कैदासीण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com