David Warner  X Twitter
Sports

AUS vs PAK, 1st Test: अफरीदीच्या गोलंदाजीवर वॉर्नरने झोपून ठोकला षटकार; दृश्य पाहून नेटकरी चक्रावले

David Warner Six: पर्थ येथे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पाकिस्तानचा विकेट टेकर असलेल्या शाहीन अफरीदीची जोरदार धुलाई. या सामन्यात डेविडनं एक षटकार मारलाय, हा षटकार पाहून अनेकजण चक्रावले.

Bharat Jadhav

David Warner hits six video viral:

पर्थ येथे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने दमदार फटकेबाजी करत पाकिस्तानी गोलंदाजांची पिसे काढली. पाकिस्तानचा विकेट टेकर असलेल्या शाहीन अफरीदीची डेविड वॉर्नरने जोरदार धुलाई केली. अफरीदीच्या गोलंदाजीवर वॉर्नरने एक षटकार लगावलाय हा षटकार पाहून सर्वजण चक्रावले आहेत. (Latest News)

शाहीन अफरिदी पाकिस्तानचा सर्वोत्तम गोलंदाज मानला जातो, पण ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी त्याची जोरदार धुलाई केली. अफरीदीने आपल्या षटकात १४ धावा दिल्या. यावेळी डेविड वॉर्नरने अफरीदीला मारलेला षटकार अनेकांच्या स्मरणात राहिलाय. वॉर्नरचा षटकार मारण्याची स्टाईल पाहून समालोचक करणारे देखील आवाक राहिलेत. नेटकरी सुद्धा चक्रावले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात शाहीनने गच्चाळ गोलंदाजी केली. त्याने टाकलेल्या चेंडूला ना कोणती दिशा होती ना दशा. बेफान होऊन शाहीन गोलंदाजी करत होता. त्यात फलंदाजीसाठी डेविड वॉर्नर होता. वॉर्नरने त्याची जोरदार धुलाई केली. डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणाऱ्या डेविडने शाहीनच्या भेदक गोलंदाजीवर झोपून षटकार मारला. हा षटकार पाहून सर्वजण चक्रावले.

शाहीन २२ वे षटक टाकत होता, शाहीनने या षटकाचा दुसरा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ टाकला. अंगावर आलेला हा चेंडू वॉर्नरने झोपून फटका मारला आणि फाइन लेगची सीमा ओलांडून हा चेंडू थेट प्रेक्षकांच्या गॅलरीत पोहोचला. वॉर्नरचा हा षटकार पाहून शाहीनसुद्धा हसू लागला. परंतु षटकार मारल्यामुले शाहीनने फलंदाजावर बाऊन्सर चेंडू मारायला सुरुवात केली. मात्र याचा वॉर्नरवर काहीही परिणाम झाला नाही, त्याने शांतपणे पाकिस्तानी गोलंदाजांचा सामना केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

SCROLL FOR NEXT