suryakumar yadav twitter
क्रीडा

Suryakumar Yadav: डेव्हिड मिलर आऊटच होता! पाहा सूर्याच्या अविश्वसनिय कॅचचा परफेक्ट अँगल

Suryakumar Yadav Catch Video: सूर्यकुमार यादवने शेवटच्या षटकात डेव्हिड मिलरचा भन्नाट झेल टिपला होता. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवने मोक्याच्या क्षणी डेव्हिड मिलरचा कॅच पकडला आणि त्याला माघारी धाडलं होतं. हा या सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला होता.

हातातून सामना निसटत असताना सूर्यकुमार यादवने पकडलेल्या या कॅचने भारतीय संघाला सामन्यात कमबॅक करुन दिलं होतं. दरम्यान सामना झाल्यानंतर सोशल मीडियावर काही व्हिडिओ जोरदार व्हायरल होत होते, ज्यात सूर्याचा पाय बाऊंड्रीलाईनला स्पर्श होत असल्याचं दिसून येत होतं. दक्षिण आफ्रिकेन फॅन्स आणि माध्यमांनी जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले होते.

सूर्याने मागच्या दिशेने धावत बाऊंड्रीलाईनवर हा भन्नाट झेल घेतला. अनेकांनी असा दावा केला की, सूर्याचा पाय बाऊंड्रीलाईनला स्पर्श झाला आहे. मात्र आता सूर्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात सूर्याने टिपलेल्या कॅचचा परफेक्ट अँगल दिसून येतोय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सूर्याने चेंडू येतोय हे पाहून व्यवस्थित अंदाज घेतला. त्यानंतर व्यवस्थितरित्या कॅच पकडली. ज्यावेळी त्याला जाणवलं की, त्याचा तोल जातोय त्यावेळी त्याने चेंडू हवेत फेकला आणि बाऊंड्रीलाईनच्या बाहेर गेला. त्यानंतर पुन्हा मैदानात आला आणि कॅच पूर्ण केला.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकअखेर २० षटकअखेर १७६ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयापासून ७ धावा दूर राहिला. यासह भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

SCROLL FOR NEXT