ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात सतत काहितरी थंड प्याव्यासे वाटते, अशातच लोक घरी थंड पेय बनवून ठेवत असतात. तसेच केशर बदाम सरबत देखील तुम्ही घरी बनवू शकता, जाणून घ्या रेसिपी.
केशर बदाम सरबत बनवण्यासाठी बदाम, दूध, साखर, मध, केशर आणि वेलची पावडर इत्यादी साहित्य लागते.
सर्वात आधी रात्रभर पाण्यात बदाम भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर भिजत ठेवलेले बदाम सोलून घ्या.
सोलून घेतलेल्या बदामांमध्ये दूध टाका आणि त्याची मऊसर पेस्ट बनवून घ्या.
दूध गॅसवर उकळवत ठेवा. उकळल्यानंतर दूध थंड करुन घ्या.
दूधात बदाम पेस्ट, साखर किंवा मध मिक्स करा. त्यासोबतच केसर कोमट दूधात भिजवून मिश्रणात टाका.
चव वाढवण्यासाठी त्यात थोडी वेलची पावडर टाका आणि सरबत थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
सर्व्ह करताना सरबतावर बदाम पिस्ता टाका. उन्हाळ्यात थंडगार केसर बदाम सरबत पिण्याचा आनंद घ्या.