Gavar-Bhopla Bhaji Recipes : कोकण स्पेशल गवार-भोपळ्याची भाजी अन् गरमागरम तांदळाची भाकरी, रात्रीच्या जेवणाचा गावरान बेत

Shreya Maskar

कोकणी फूड

तुम्हाला काहीतरी गावरान खावंसं वाटत असेल तर गवार-भोपळ्याची भाजी बनवा. ही कोकणी रेसिपी चवीला खूपच भारी लागते.

Konkan | yandex

गवार-भोपळ्याची भाजी

गवार-भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी भोपळा, गवार , मोहरी ‌, मेथी दाणे, हळद, पाणी, मीठ, लाल मिरची पावडर, गूळ , गोडा मसाला , ओले खोबरे इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात शेंगदाण्याचा कूट देखील टाकू शकता.

Gavar-Bhopla Bhaji | yandex

भोपळा

गवार-भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम भोपळा धुवून त्याची साल काढून छोटे तुकडे करा. त्यानंतर गवार धुवून बारीक तोडून घ्या.

Pumpkin | yandex

गवार

एका पॅनमध्ये तेल, मोहरी, मेथी दाणे, हिंग, हळद आणि बारीक गवार टाकून परतून घ्या. वाफेवर भाजी चांगली शिजते.

Guar | yandex

भोपळ्याचे तुकडे

गवार चांगली तेलावर शिजली की यात भोपळ्याचे तुकडे घालून पाणी शिंपडा. तुम्ही भोपळ्याचे तुकडे आधी कुकरला देखील लावू शकता.

Pumpkin pieces | yandex

शेंगदाण्याचा कूट

गवार-भोपळ्याची भाजी चांगली परतवून घ्या. त्यानंतर भाजीची चव वाढवण्यासाठी यात शेंगदाण्याचा कूट देखील टाका. शेंगदाण्यांमुळे भाजीची चव आणखी वाढते.

Peanut butter | yandex

मसाले

त्यानंतर यात मीठ, गूळ, लाल तिखट, गोडा मसाला घालून परतवून घ्या. जेणेकरून भाजीला चांगला मसाला लागेल.

Spices | yandex

ओले खोबरे

शेवटी वरून ओले खोबरे घालून गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत गवार-भोपळ्याच्या भाजीचा आस्वाद घ्या. तुम्ही सकाळच्या टिफिनला देखील ही रेसिपी बनवू शकता.

coconut | yandex

NEXT : गव्हाच्या पीठापासून बनवा बेकरी स्टाइल केक, फॉलो करा 'या' स्टेप्स

Homemade Cake Recipe | saam tv
येथे क्लिक करा...