आयपीएल २०२४ स्पर्धेतील ४९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला ७ गडी राखून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. एमएस धोनी स्ट्राईकवर असताना डॅरील मिचेलने धावत २ धावा पूर्ण केल्या. मात्र धोनीने काही स्ट्राईक सोडली नाही. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
ही घटना चेन्नई सुपर किंग्ज संघाची फलंदाजी सुरु असताना घडली. तर झाले असे की, चेन्नई सुपर किंग्ज संघाची फलंदाजी सुरु असताना २० वे षटक टाकण्यासाठी अर्शदीप सिंग गोलंदाजीला आला होता. एमएस धोनी १८ व्या षटकात फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. त्यानंतर १९ व्या षटकात डॅरील मिचेल फलंदाजीला आला.
तर झाले असे की, २० व्या षटकातील तिसरा चेंडू अर्शदीपने फुलटॉस टाकला. ज्यावर धोनीने डीप कव्हर्सच्या दिशेने शॉट मारला. हा चेंडू सीमारेषेपर्यंत गेला होता. हे पाहून डॅरील मिचेलने धाव घेतली. मात्र त्याने जेव्हा पाहिलं, तेव्हा धोनीने स्ट्राईक सोडली नसल्याचं त्याला जाणवलं. त्यावेळी त्याने धाव पूर्ण केली आणि पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकवर परतला. त्याने धावत २ धावा पूर्ण केल्या. मात्र धोनी काही हलला नाही.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर पंजाबने नाणेफेक जिंकत चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. चेन्नईकडून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार ऋतुराज गायकवाडने ४८ चेंडूंचा सामना करत ६२ धावांची खेळी केली. त्यात ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. चेन्नई सुपर किंग्जने पहिल्या डावात ७ गडी बाद १६२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने १७.५ षटकात ७ गडी राखून विजय मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.