essex team  twitter
Sports

T-20 Blast: IPL मध्ये फुसका बार निघाला, इंग्लंडच्या स्पर्धेत आतषबाजी केली; डावखुऱ्या गोलंदाजाची रेकॉर्डब्रेक बॅटिंग

Daniel Sams Batting: इंग्लंडमध्ये टी -२० ब्लास्ट स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेतील ८५ वा सामना एसेक्स आणि मिडलसेक्स या दोन्ही संघामध्ये पार पडला.

Ankush Dhavre

Vitality T20 Blast: इंग्लंडमध्ये टी -२० ब्लास्ट स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेतील ८५ वा सामना एसेक्स आणि मिडलसेक्स या दोन्ही संघामध्ये पार पडला. या रोमांचक सामन्यात एसेक्स संघाने दमदार कामगिरी करत २२ धावांनी विजय मिळवला आहे.

एसेक्स संघातील अष्टपैलू खेळाडू डॅनियल सॅम्सने अवघ्या २४ चेंडूंमध्ये ६७ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर एसेक्स संघाला विजय मिळवता आला आहे. डॅनियल सॅम्स हा आयपीएल स्पर्धेत लखनऊ सुपरजायंट्स संघाचा भाग होता.

लखनऊ सुपरजायंट्स संघाकडून खेळताना त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. सर्व सामन्यांमध्ये त्याला बाकावर बसुन राहावं लागलं होतं. लखनऊ सुपरजायंट्स संघाचे प्रतिनिधित्व करण्यापुर्वी त्याने मुंबई इंडियन्स,रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

टी -२० ब्लास्ट स्पर्धेतील या हंगामात त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. तो एसेक्स संघाकडून दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने १७६ च्या स्ट्राइक रेटने २२८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १५ गगनचुंबी षटकार मारले आहेत. (Latest sports updates)

दमदार फॉर्ममध्ये असलेल्या डॅनियल सॅम्स आतापर्यंत एसेक्स संघासाठी ३ अर्धशतके झळकावली आहेत. ज्यावेळी तो फलंदाजी करण्यासाठी आला त्यावेळी संघाची धावसंख्या ४ गडी बाद १४९ इतकी होती.

त्याने फलंदाजीला येताच तुफान हाणामारी करायला सुरूवात केली. या संघातील सलामीवीर फलंदाज डॅन लॉरेंसने ३० चेंडूंचा सामना करत ५३ धावांची खेळी केली. तर मायकल पेपरने ६४ धावांची खेळी केली.

डॅनियल सॅम्सची कारकिर्द..

डॅनियल सॅम्सला आतापर्यंत १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने १०६ धावा केल्या आहेत. तर ४१ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. तर गोलंदाजी करताना त्याने ७ गडी बाद केले आहेत.

आयपीएल स्पर्धेतील १६ सामन्यांमध्ये त्याला ४४ धावा करता आल्या आहेत. यादरम्यान त्याला १४ गडी बाद करण्यात यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : वाईट संकटांचा सामना करावा लागेल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Milk Mithai: दूधापासून घरीच बनवा 'या' टेस्टी मिठाई

Pune News: पुण्यात पोलिसांची दलित मुलींवर खोलीत घुसून मारहाण; कायद्याचे धिंडवडे

JKSSB Recruitment: वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी; महिन्याला मिळेल बक्कळ पगार, कुठे कसा कराल अर्ज?

Ind vs Eng : शेवटच्या विकेटआधी वाद! मोहम्मद सिराज कॅप्टन गिलवर संतापला, नेमकं काय घडलं? Video

SCROLL FOR NEXT