Mohammed Shami  X
Sports

Mohammed Shami : जे कुणालाच जमलं नाही, ते शमीनं करुन दाखवलं; आयपीएलमध्ये रचला अनोखा विक्रम

CSK VS SRH IPL 2025 : आयपीएल २०२५ मधील ४३ व्या सामन्यात चेन्नई आणि हैदराबाद हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने चेन्नईचा शेख रशीदला माघारी पाठवले.

Yash Shirke

CSK VS SRH : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना आज चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यामध्ये हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शेख रशीद आणि आयुष म्हात्रे हे चेन्नईचे सलामीवीर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले.

चेन्नईकडून शेख रशीद स्ट्राईकवर होता, आयुष्य म्हात्रे नॉन-स्ट्राईकर एन्डला होता. हैदराबादकडून पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी मोहम्मद शमी आला. शमीने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर शेख रशीद कॅचआउट झाला. अभिषेक शर्माने त्याची कॅच पकडली. सामन्याच्या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेत मोहम्मद शमीने नवा विक्रम केला.

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने तब्बल चार वेळा सामन्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा विक्रम रचला आहे. आयपीएलच्या इतिहासात २०१४ मध्ये जॅक्स कॅलिस, २०२२ मध्ये केएल राहुल, २०२३ मध्ये फिल सॉल्ट आणि आता २०२५ मध्ये शेख रशीद अशा प्रकारे, चार वेळेस मोहम्मद शमीने सामन्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेतली.

मोहम्मद शमीनंतर ट्रेंट बोल्ट, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांनी सामन्याच्या पहिल्या चेंडूवर फलंदाजाची विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला आहे. बोल्टने २०२० मध्ये मार्कस स्टोयनिसला आणि २०२३ मध्ये विराट कोहलीला; भुवनेश्वर कुमारने २०१३ मध्ये कुसल परेरा आणि २०२३ मध्ये प्रभसिमरन सिंह आणि उमेश यादवने २०१७ मध्ये ख्रिस गेल आणि २०१८ मध्ये सूर्यकुमार यादवला बाद केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: CA झाला, अमेरिकेतील लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी धुडकावली, पहिल्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS केशव गोयल यांचा प्रवास

Pune : जिवाभावाचा मित्र वाढदिवसाला आलाच नाही, संतापलेल्या दोस्तांनी २५ वाहनांची केली तोडफोड

Friday Horoscope : जवळच्या लोकांकडून वाहवाह होईल, प्रगती घडेल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Red Alert in Maharashtra : पाऊस आज कहर करणार, ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट, IMD च्या इशाऱ्यानंतर २ जिल्ह्यातील शाळा-कॉलेज बंद

Shukrwar che Upay: शुक्रवारच्या 'या' उपायांनी भाग्याचे दरवाजे उघडतील; घरात सुख-समृद्धी सोबत पैसाही येईल

SCROLL FOR NEXT