CSK VS SRH IPL 2025 X
Sports

CSK VS SRH : चेपॉकमध्ये हैदराबादनं चेन्नईला चेपलं, पहिल्यांदा घरच्या मैदानात All Out करत आस्मान दाखवलं

CSK VS SRH IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या ४३ व्या सामन्यामध्ये चेन्नई आणि हैदराबाद हे संघ आमनेसामने आले आहेत. टॉस जिंकत हैदराबादने प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईचा संघ १५४ धावांवर ऑल आउट झाला.

Yash Shirke

IPL 2025 : चेपॉक स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना सुरु आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. त्यांनी १९.५ ओव्हर्समध्ये १५४ धावा केल्या. चेपॉक स्टेडियमवर पहिल्यांदाच चेन्नईचा संघ ऑल आउट झाला आहे.

सलामीसाठी आलेला शेख रशीद शून्यावर बाद झाला. आयुष म्हात्रेने आक्रमक शॉट मारत ३० धावा केल्या. सॅम करन फक्त ९ धावा करुन माघारी परतला. रवींद्र जडेजाने २१ धावा केल्या. डेब्यू करणाऱ्या डेवाल्ड ब्रेव्हिस ४२ धावा करुन तंबूत परतला. १२ धावांवर शिवम दुबेची विकेट पडली. कॅप्टन एमएस धोनीने ६ धावा केल्या. खलील अहमद आणि दिपक हुडा यांनी सीएसकेचा डाव १५० पार नेला.

दुसऱ्या बाजूला सनरायजर्स हैदराबाद सुरुवातीपासून चेन्नईवर दबाव टाकत असल्याचे पाहायला मिळाले. आयुष म्हात्रे आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी प्रतिकार केला पण हैदराबादच्या गोलंदाजांनी त्यांना माघारी पाठवले. हर्षल पटेलने चार विकेट्स; पॅट कमिन्स आणि जयदेव उनादकटने २ विकेट्स; मोहम्मद शमी आणि कामिंडू मेंडिस यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सनरायझर्स हैदराबादची प्लेईंग ११ :

अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, कामिंडू मेंडिस, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, जीशान अन्सारी, मोहम्मद शमी

इम्पॅक्ट प्लेयर्स - ट्रॅव्हिस हेड, अभिनव मनोहर, सचिन बेबी, राहुल चहर, विआन मुल्डर

चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग ११ :

शेख रशीद, आयुष म्हात्रे, सॅम करन, रवींद्र जडेजा, डेवाल्ड ब्रेव्हिस, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार), दीपक हुडा, नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पाथिराना

इम्पॅक्ट प्लेयर्स - अंशुल कंबोज, रविचंद्रन अश्विन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, जेमी ओव्हरटन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरातील जैन समाजाची जमीन संग्राम जगताप यांनी हडप केल्याचा आरोप

Accident News : पुण्यात अपघाताचा भयानक थरार! भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली, गाडीचा चक्काचूर

Ladki Bahin Yojana : फक्त १२ दिवस शिल्लक! आतापर्यंत फक्त ८० लाख लाडक्या बहिणींचे e-KYC पूर्ण; मुदत वाढवणार का? आदिती तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं

Woman Physical Changes: प्रेग्नेसीनंतर स्त्रियांच्या शरीरात होतात हे ५ बदल, वेळीच घ्या काळजी

Local Body Election : शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला जोरदार धक्का, नंदुरबारमध्ये अनेकांनी कमळाची साथ सोडली

SCROLL FOR NEXT