shreyas iyer viral video  Saam tv
Sports

क्रिकेटच्या मैदानात राडा घालणारा श्रेयस अय्यर आहे जादूगार! 52 पत्त्यामधून नेमका काढला बदामचा एक्का, व्हिडिओ व्हायरल

shreyas iyer viral video : क्रिकेटच्या मैदानात राडा घालणाऱ्या श्रेयस अय्यरची जादू सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा व्हिडिओची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Vishal Gangurde

श्रेयस अय्यरच्या जादूच्या कलेने सर्वांना केले चकित

‘कपिल शर्मा शो’मध्ये त्याच्या पत्त्यांचा ट्रिक व्हायरल

श्रेयसच्या अचूक बदामचा एक्का ओळखून प्रेक्षकांना चकीत

टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यर हा मैदानावर तुफान फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे. श्रेयस आक्रमक फलंदाजी करत गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत असतो. संघासाठी धावांचा डोंगर उभारणारा श्रेयस अय्यर मैदानाबाहेर देखील चांगलाच प्रसिद्ध आहे. त्याने हटके जादूने चाहत्यांनाही चकीत केलं आहे. ५२ पत्त्यामधून नेमका बदामचा एक्का काढणाऱ्या श्रेयस अय्यरचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारताचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर 'कपिल शर्मा शो'मध्ये गेला होता. श्रेयसच्या जोडीला रोहित शर्मा देखील होता. त्यावेळी 'शो'मध्ये त्याने जादू दाखवली. त्याच्या या जादूने प्रेक्षक आणि चाहते चकीत झाले. त्याचा जादूचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

श्रेयसने काय जादू केली?

कार्यक्रमात कपिल शर्मा बोलतो की, 'फार कमी लोकांना माहीत आहे की, श्रेयस अय्यर कार्डच्या जादूने अनेकांना चकीत करतो'. कार्यक्रमात त्यानंतर श्रेयसला पत्ते देण्यात आले. श्रेयसने कपिल शर्माला सर्व पत्त्यांमधून एक पत्ता काढायला सांगितला. त्यानंतर कपिलने श्रेयसला न दाखवता बदाम एक्का पत्ता काढला. त्यानंतर तो पत्ता पुन्हा सर्व पत्त्यांमध्ये एकत्र केला.

पुढे श्रेयसने कपिलला मनातलं एक नाव घ्यायला सांगितले. त्यानंतर कपिलने अर्चना पूरन सिंह यांचं नाव घेतलं. कपिलने अर्चना यांची इंग्रजी स्पेलिंग देखील सांगितली. त्यानंतर त्यांच्या स्पेलिंगनुसार मोजके पत्ते टेबलावर ठेवले. त्यातील शेवटचा पत्ता बदामचा एक्का होता. श्रेयसच्या कार्यक्रमातील या जादूने प्रेक्षकही चकीत झाले. श्रेयसने केलेल्या जादूचा व्हिडिओ सोशल प्रचंड चर्चेत आहे. त्याचा व्हिडिओ लाखो जणांनी पाहिला आहे. तर शेकडो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT