RCB vs SRH : पहिल्याच बॉलवर कॅच आऊटचा रिव्ह्यू; अभिषेक शर्मा थोडक्यात वाचला, दुसऱ्याच चेंडूवर IPL चा पहिलाच उत्तुंग षटकार

RCB vs SRH, IPL 2026 : यंदाच्या आयपीएलमधील पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या पहिल्याच सामन्यात अभिषेक शर्मानं यंदाच्या आयपीएलमधील पहिलाच षटकार ठोकण्याचा मान मिळवला.
अभिषेक शर्माचा दुसऱ्याच चेंडूवर उत्तुंग षटकार
Abhishek Sharma in IPL 2026saam tv
Published On

वर्ल्डकपमध्ये सुरुवातीच्या सामन्यांमध्ये झुंझणारा झुंझार फलंदाज अभिषेक शर्मा यानं आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात पहिला षटकार लगावला. रॉयल चॅलेंजर्सचा गोलंदाज डफीनं फेकलेल्या चेंडूवर अभिषेकनं उत्तुंग षटकार ठोकला.

आयपीएलचा थरार सुरू झालाय. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पहिलाच सामना झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रजत पाटीदारनं डफीकडं चेंडू सोपवला. हैदराबाद संघाकडून सलामीला अभिषेक शर्मा आणि हेड आले. हेडनं एक धाव घेतल्यानंतर अभिषेक शर्मा स्ट्राइकला आला. पहिलाच चेंडू बॅटच्या अगदी जवळून गेला. त्यावर बेंगळुरूनं अपील केलं. पंचांनी नाबाद घोषित केल्यानंतर बेंगळुरूच्या कर्णधारानं थर्ड अंपायर रिव्ह्यू मागितला. रिव्ह्यू बघितल्यानंतर अभिषेक थोडक्यात बचावल्याचं त्यात दिसलं. त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर अभिषेक शर्मानं उत्तुंग षटकार ठोकला. यंदाच्या आयपीएलमधील हा पहिलाच षटकार होता.

टी २० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अर्धशतकी खेळी करून भारताला जेतेपद मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या अभिषेक शर्माकडून आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मोठी अपेक्षा होती. पहिल्याच सामन्यातील पहिल्याच चेंडूवर तो हुकला. डीआरएसमध्ये तो थोडक्यात बचावला. दुसऱ्याच चेंडूवर त्यानं तगडा षटकार खेचला. त्यावेळी अभिषेक शर्मा मोठी खेळी करेल अशी अपेक्षा होती. प्रेक्षक आणि चाहत्यांच्याही अपेक्षा उंचावल्या. मात्र, त्यानंतर तो बेंगळुरूच्या डफीसमोर शरण गेला.

अभिषेक शर्माचा दुसऱ्याच चेंडूवर उत्तुंग षटकार
IPL 2026 lifts ban : IPL सामन्यांवरील बंदी उठवली; या सरकारनं घेतला मोठा निर्णय

अभिषेक शर्माला बेंगळुरूचा वेगवान गोलंदाज जेकब डफी यानं बाद केलं. स्टम्पच्या मागे जितेश शर्मानं त्याचा झेल टिपला. या सामन्यात त्यानं एका षटकाराच्या मदतीनं आठ चेंडूंत फक्त सात धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट शंभरपेक्षा कमी होता.

त्यानंतर धडाकेबाज फलंदाज ट्रेविस हेड यानंही निराशा केली. त्याला डफीनेच बाद केले. हेड यानं ९ चेंडूंत फक्त ११ धावा केल्या. हेड बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या नितीश कुमार रेड्डीनंही घोर निराशा केली. सहा चेंडूंचा सामना केला. त्यात फक्त एक धाव करता आली. डफीनंच त्याला झेलबाद केलं. या आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनंदन सिंह यानं त्याचा झेल टिपला.

अभिषेक शर्माचा दुसऱ्याच चेंडूवर उत्तुंग षटकार
IPL 2026 मध्ये कोणत्या टीमच्या कर्णधाराला सर्वात कमी सॅलरी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com