Surabhi Jayashree Jagdish
IPL 2026 मध्ये सर्वाधिक सॅलरी घेणारा कर्णधार म्हणजे ऋषभ पंत. लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कडून त्यांना तब्बल 27 कोटी रुपये मिळतात. यामुळे तो या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला 26.75 कोटी रुपये सॅलरी मिळते. तो IPL 2026 मधील दुसऱ्या सर्वाधिक सॅलरी घेणारा कर्णधार आहे. त्याची सॅलरी पंतपेक्षा थोडी कमी आहे.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स आणि चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड या दोघांचीही सॅलरी सारखीच आहे. दोघांनाही 18-18 कोटी रुपये सॅलरी मिळते. म्हणून ते संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत.
दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल यांचा पगार सारखा आहे. या दोन्ही कर्णधारांना 16.50 कोटी रुपये सॅलरी मिळते.
मुंबई इंडियन्सचे कर्णधार हार्दिक पंड्याला 16.35 कोटी रुपये मिळतात. त्यांची सॅलरी अक्षर आणि गिलपेक्षा थोडी कमी आहे. तरीही ते टॉप कमाई करणाऱ्या कर्णधारांमध्ये आहेत.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागला 14 कोटी रुपये सॅलरी मिळते. त्याची कर्णधार म्हणून ही मोठी जबाबदारी आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला फक्त 1.5 कोटी मिळतात. ही IPL 2026 मधील सर्वात कमी सॅलरी आहे.