भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंगला अंडरवर्ल्डकडून धमकी
५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी
धमकी दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीकडून देण्यात आली
मुंबई क्राईम ब्रांचने दोन आरोपींना अटक केली
आशिया कप जिंकणाऱ्या भारताच्या स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंगला अंडरवर्ल्डकडून धमकी देण्यात आली आहे. रिंकू सिंगकडे ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. रिंकूला धमकी दिल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली. रिंकू सिंगला यापूर्वी देखील धमक्या देण्यात आल्या आहेत.
मुंबई क्राइम ब्रांचने सांगितले की, रिंकू सिंगला ही धमकी दुसऱ्या कोणाकडूनही नसून मोस्ट वॉन्टेड गुंड दाऊद इब्राहिम टोळी म्हणजेच डी-कंपनीकडून आली आहे. फेब्रुवारी ते एप्रिल २०२५ दरम्यान रिंकूच्या प्रमोशनल टीमला तीन धमक्यांचे मेसेज पाठवण्यात आले होते. रिंकू सिंगला यावर्षी तीन वेळा धमक्या मिळाल्या.
धमकीचे मेसेज थटे रिंकू सिंगला नाही तर त्याच्या प्रमोशनल टीमला पाठवण्यात आले होते. क्राईम ब्रांचने सांगितले की, हे प्रकरण एका मोठ्या रॅकेटशी जोडलेले आहे. कारण झिशान सिद्दीकीला देखील अशाच प्रकारच्या धमकीचे ईमेल आले होते. रिंकू सिंगला धमकी दिल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी धमकी दिल्याची कबुली दिली आहे.
यापूर्वी झिशान सिद्दीकीचे वडील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर त्याला धमकी देत १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात मोहम्मद दिलशाद आणि मोहम्मद नवीद यांना इंटरपोलच्या मदतीने त्रिनिदाद आणि टोबॅगो येथून आधीच अटक करण्यात आली आहे. झिशानला १९ ते २१ एप्रिल दरम्यान हे धमकीचे ईमेल आले होते. ज्यामध्ये त्याला खंडणी न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा देखील इशारा देण्यात आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.