Pakistan Threat: आता युद्ध झालं तर भारत आपल्याच फायटर जेटच्या ढिगाऱ्याखाली मिळेल; पाकिस्तानची पुन्हा धमकी

Pakistan Threat To India : पाकिस्तानचे सुरक्षामंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला परत एकदा धमकी दिलीय. जर आता युद्ध झाल तर भारत आपल्याच फायटर जेटच्या ढिगाऱ्याखाली दिसून येईल.
Pakistan Threat To  India
Pakistan Defence Minister Khawaja Asif warns India with another hollow war threat after IAF’s Operation Sindoor.saam tv
Published On
Summary
  • पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला पोकळ धमकी दिली.

  • ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे ११ हवाई तळ उद्ध्वस्त केले.

  • भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी फायटर जेट पाडले.

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे पाच लढाऊ जेट खाली पाडले. पुढे युद्ध झाले तर यापेक्षा भयाकन होईल,असा इशारा भारतीय हवाई दल प्रमुखांनी दिला होता. आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी रविवारी भारताला पोकळ धमकी दिलीय. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानचे ११ हवाई तळ उद्ध्वस्त केल्यानंतरही पाकिस्तानचा अहंकार अजूनही कमी झालेला नाहीये.

Pakistan Threat To  India
Bihar Election: मतदान प्रक्रियेत मोठा बदल; प्रत्येक बूथवर फक्त १२०० मतदार,मोबाईलच्या वापरास बंदी

भविष्यात पाकिस्तानशी कोणताही लष्करी संघर्ष किंवा शत्रुत्व निर्माण झाल्यास निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल. जर पुन्हा युद्ध झाले तर भारत स्वतःच्या लढाऊ विमानांच्या ढिगाऱ्याखाली गाडला जाईल, असं ख्वाजा आसिफ म्हणाले. भारतीय लष्कर प्रमुखांच्या इशाऱ्यानंतर आसिफ यांनी ही धमकी दिलीय. पाकिस्तानाने आता कोणतीच कुरापत करू नये,असा सुचक इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिला होता.

Pakistan Threat To  India
Floods: पावसाचा हाहाकार! एअरपोर्ट, शाळा- कार्यालय बंद; रस्ते ब्लॉक, नेपाळमध्ये २४ तासापासून मुसळधार

त्यानंतर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी धमकी दिलीय. भारताचे हवाई दल प्रमुख एपी सिंह यांनी शुक्रवारी सांगितले होते की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हल्ल्यात अमेरिकेतील एफ-१६ विमानांसह किमान एक डझन पाकिस्तानी लष्करी विमाने नष्ट झाली किंवा त्यांचे नुकसान झाले. या ऑपरेशन सिंदूरच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या सैनिकांची ठिकाणं उद्धवस्त झाली होती, त्यानंतर पाकिस्तानने युद्धविराम करण्याची विनंती केली होती, भारतीय सैन्यानं दावा केलाय.

दरम्यान यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना म्हटलं की, नवी दिल्लीमधील लष्कार अधिकाऱ्यांची आणि राजकीय नेत्यांची विधानातून त्यांचा आत्मविश्वास गमावलाय. तो परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मे महिन्यात झालेल्या युद्धात भारताचा पराभव झाला, त्यांचाच हा परिणाम आहे, असं आसिफ म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com