T20 World Cup 2024: हार्दिक, दिनेश कार्तिक की रिंकू सिंग; फिनिशर म्हणून कोणाला मिळणार टीम इंडियात स्थान?

Team India For ICC T20 World Cup 2024: आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघाला चांगल्या फिनिशरची गरज आहे. दरम्यान या तिघांपैकी कोणाला स्थान मिळणार? जाणून घ्या.
Will Dinesh Karthik get place in team India as finisher know his records and stats cricket news marathi
Will Dinesh Karthik get place in team India as finisher know his records and stats cricket news marathi twitter/yandex

टी -२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात दिनेश कार्तिकने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल केला. या संपूर्ण स्पर्धेत त्याने फिनिशरची भूमिका योग्यरीत्या पार पाडली आहे. धावांचा पाठलाग करताना त्याने ३५ चेंडूत ८३ धावांनी वादळी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ७ षटकार मारले. यापूर्वी मुंबई इंडियन्स आणि पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याची बॅट चांगलीच तळपली होती.

फिनिशर म्हणून भारतीय संघात संधी मिळणार का?

आयपीएल २०२४ स्पर्धा झाल्यानंतर लगेचच टी -२० वर्ल्डकप स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. या संघात फिनिशर म्हणून स्थान मिळवण्यासाठी रिंकू सिंग आणि दिनेश कार्तिक ही दोन नावं आघाडीवर आहेत. तर हार्दिक पंड्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.

Will Dinesh Karthik get place in team India as finisher know his records and stats cricket news marathi
IPl 2024: हार्दिक पांड्याचं T20WC मध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार? पुढील ८सामन्यात ठरणार भवितव्य

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हार्दिकने काही महत्वपूर्ण धावा केल्या. मात्र उर्वरित सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरल्याचं दिसून आलं आहे. तर दुसरीकडे वयाच्या ३८ व्या वर्षी दिनेश कार्तिकने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. या स्पर्धेत आक्रमक फलंदाजी करून त्याने भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी दावा केला आहे.

Will Dinesh Karthik get place in team India as finisher know his records and stats cricket news marathi
Dinesh Karthik Six: दिनेश कार्तिकने खेचला IPL 2024 स्पर्धेतील सर्वात लांब षटकार! चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर- Video

अशी आहे कारकिर्द..

दिनेश कार्तिकच्या टी -२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत ६० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २६.३८ च्या सरासरीने आणि १४२.६२ च्या सरासरीने ६८६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला १ अर्धशतक करता आलं आहे. तर आयपीएल स्पर्धेतील २४९ सामन्यांमध्ये त्याने २६.६४ च्या सरासरीने ४७४२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २२ अर्धशतकं झळकावली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com