RCB Playoffs Scenario: RCB ला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! कसं असेल समीकरण? जाणून घ्या

IPL Playoffs Scenario For IPL 2024: सुमार कामगिरीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. मात्र अजूनही हा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. कसं असेल समीकरण? जाणून घ्या.
Royal challengers Bangalore can still qualify in ipl playoffs know the scenario amd2000
Royal challengers Bangalore can still qualify in ipl playoffs know the scenario amd2000twitter

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला सनरायझर्स हैदराबाद संघाकडून २५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या संघाने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. यादरम्यान केवळ १ सामना जिंकण्यात यश आलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ केवळ पंजाब किंग्जविरुद्ध विजय मिळवू शकला आहे. या सुमार कामगिरीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. मात्र अजूनही हा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. कसं असेल समीकरण? जाणून घ्या.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अजूनही करू शकतो प्लेऑफमध्ये प्रवेश?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला अजूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. मात्र हा प्रवास खडतर असणार आहे. सध्या गुणतालिकेत शेवटी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ७ सामने खेळले असून केवळ १ सामना जिंकला आहे. उर्वरित ७ सामने जिंकले तर हा संघ १६ गुणांपर्यंत मजल मारू शकतो. मात्र इतक्यात काहीच होऊ शकत नाही. इथून पुढे सर्व सामने जिंकले, तरीसुद्धा या संघाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल. जे खूप कठीण आहे.

Royal challengers Bangalore can still qualify in ipl playoffs know the scenario amd2000
Dinesh Karthik Six: दिनेश कार्तिकने खेचला IPL 2024 स्पर्धेतील सर्वात लांब षटकार! चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर- Video

असा राहिलाय आतापर्यंतचा प्रवास..

नुकताच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला २५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने २८७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला २६२ धावांपर्यंत मजल मारता आली.

या संघाने आतापर्यंत केवळ पंजाब किंग्ज संघाला पराभूत केलं आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Royal challengers Bangalore can still qualify in ipl playoffs know the scenario amd2000
Dinesh Karthik Six: दिनेश कार्तिकने खेचला IPL 2024 स्पर्धेतील सर्वात लांब षटकार! चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर- Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com