भारतीय क्रिकेटपटू मयंक अग्रवालची तब्येत अचानक बिघडल्याची बातमी समोर आलीय. मयंक त्रिपुराची राजधानी आगरतळा येथून सुरतला जात होता. आगरतळा ते सुरत दरम्यान विमानाने प्रवास करत असताना अग्रवालची तब्येत बिघडलीय. मंयक अग्रवालला अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तेथील स्टाफने त्याला विमानातून उतरवून आगरतळा येथील रुग्णालयात दाखल केले.(Latest News)
मिळालेल्या माहितीनुसार,मयंक आपल्या रणजी संघ कर्नाटकचे नेतृत्व करत होता. २६ ते २९ जानेवारी दरम्यान त्रिपुराविरुद्ध सामना खेळल्यानंतर तो पुढील सामन्याच्या तयारीसाठी सुरतला जात होता. परंतु प्रवासातच त्याची तब्येत बिघडली. दरम्यान मयंक अग्रवाल यांची तब्येत खालावल्याने त्याला आगरतळा येथील आयएलएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तेथे डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये ठेवले आहे. डॉक्टरांनी त्याच्या तब्येतीची कोणतीची माहिती मीडियाला अद्याप दिली नाहीये. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अग्रवालची तब्येत सध्या ठीक आहे. दरम्यान प्राथमिक माहितीनुसार विमानामध्ये चढल्यानंतर मयंकच्या तोंडात आणि घशात काही त्रास होऊ लागला होता. यानंतर त्याला तातडीने विमानातून उतरवून रुग्णालयात नेण्यात आले.
मयंक अग्रवाल विमानात बसण्यापूर्वी पाणी प्यायला होता. त्यानंतर त्याच्या घशात आणि तोंडात त्रास होऊ लागला होता. पाण्यात काही विषारी द्रव्य असल्याचाही अंदाज वर्तवला जातोय. मात्र सध्या अग्रवालची प्रकृती ठीक असली तरी त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याला ठेवण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.