Hair Care: कोंडा होईल कायमचा दूर केस होतील सिल्की, केसांवर आठवड्यातून एकदा लावा किचनमधील हा पदार्थ

Shruti Vilas Kadam

केसांसाठी ताक वापरावे?

अर्धा कप ताक थेट टाळू आणि केसांवर लावा. 20 ते 30 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. अधिक फायदे मिळवण्यासाठी ताकामध्ये मेथी पावडर, कोरफड जेल किंवा कढीपत्त्याची पेस्ट मिसळू शकता. आठवड्यातून 1 ते 2 वेळा हा उपाय करा.

Hair Care | Saam tv

कोंडा कमी करण्यास मदत करते

ताकातील लॅक्टिक अॅसिड टाळूवरील मृत त्वचा आणि अतिरिक्त तेल साफ करण्यास मदत करते. त्यामुळे कोंडा कमी होऊन टाळू स्वच्छ राहते.

Hair Care | Saam Tv

केसांना नैसर्गिक चमक देते

ताकातील पोषक घटक केसांना खोलवर पोषण देतात. नियमित वापरामुळे केस अधिक मऊ, चमकदार आणि निरोगी दिसू लागतात.

Hair Care | Saam tv

कोरड्या टाळूला मॉइश्चराइज करते

टाळू खूप कोरडी असल्यास ताक नैसर्गिक मॉइश्चरायझरचे काम करते. यामुळे खाज आणि कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळते.

Hair Care

केस गळती कमी करण्यास उपयुक्त

ताकामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे असतात. हे घटक केसांच्या मुळांना बळकट करून केस गळती कमी करण्यास मदत करू शकतात.

Hair Care

फ्रिझी केस नियंत्रित करते

ताकाचा हेअर मास्क केसांवरील कोरडेपणा कमी करतो. त्यामुळे उडणारे आणि विस्कटलेले केस अधिक व्यवस्थित दिसतात.

Hair care | Saam Tv

टाळू स्वच्छ ठेवते

ताक नैसर्गिक क्लिन्झरप्रमाणे काम करते. हे टाळूवरील घाण, धूळ आणि अतिरिक्त तेल दूर करून केसांचे आरोग्य सुधारते. निरोगी टाळू हे चांगल्या केसवाढीसाठी आवश्यक असते. ताक टाळूचे आरोग्य सुधारून केसांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार करते.

Hair Care

Face Care: चेहऱ्यावरील काळे डाग आणि खड्डे होतील कायमचे दूर, रात्री झोपताना 10 मिनिटांसाठी लावा ही पेस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care | Saam tv
येथे क्लिक करा