Manasvi Choudhary
प्रत्येक मुलीला आपले केस लांब, काळेभोर आणि दाट असावेत असे वाटते. यासाठी त्या अनेक उपाय देखील करतात.
तर काही महिला व मुली या पार्लरच्या ट्रिंटमेंट देखील घेतात. मात्र आज आम्ही तुम्हाला घरगुती सोपा उपाय सांगणार आहोत.
दही केसांसाठी अत्यंत गुणकारी मानला जातो. महागड्या आणि केमिकल हेअर स्पा ट्रीटमेंट्सपेक्षा तुम्ही घरच्या घरी दह्याचा वापर केसांना केल्याने मुळांना पोषण मिळते.
दह्यामध्ये नैसर्गिकरित्या अँटी-फंगल गुणधर्म असते जे टाळूवरील बुरशीजन्य संसर्ग साफ करून केसांमधील कोंडा मुळापासून नष्ट करते.
केसांना दही लावल्याने चमक वाढते. तुमचे केस जर कोरडे झाले असतील तर मऊ, मुलायम केसांसाठी तुम्ही केसांना दही लावू शकता.
केसांना दही लावल्याने जे केसांच्या मुळांना आतून पोषण देते. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळती
दह्याचा हेअर पॅक बनवण्यासाठी एका वाटीमध्ये दही चांगले फेटून घ्या नंतर हे दही केसांच्या मुंळाना टोकापासून लावा आणि नंतर कोमट पाण्याने केस धुवा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.