Cricket South Africa Announced 8 Venues for ICC Cricket World Cup 2027 Know the Full List yandex
Sports

World Cup 2027 Venues: वर्ल्डकप स्पर्धेचा बिगुल वाजला! या ८ मैदानांवर रंगणार सामने

ICC World Cup 2027 News in Marathi: वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेचा थरार दक्षिण आफ्रिकेत रंगणार आहे. या स्पर्धेतील सामने नामिबिया आणि झिम्बाब्वेमध्ये रंगणार आहे.

Ankush Dhavre

ODI World Cup 2027 Venues:

वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेचा थरार दक्षिण आफ्रिकेत रंगणार आहे. या स्पर्धेतील सामने नामिबिया आणि झिम्बाब्वेमध्ये रंगणार आहे. ही स्पर्धा २०२७ च्या सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यात रंगणार आहे. आता या स्पर्धेतील सामन्यांच्या ठिकाणांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

या मैदानांवर रंगणार सामने...

या स्पर्धेतील सामने जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियम, प्रिटोरियातील सेंच्युरियन पार्क, डर्बनच्या किंग्समीड, सेंट जॉर्ज, सुपरस्पोर्ट पार्क, न्यूलँड्स स्टेडियम, बफेलो पार्क आणि द मांगुआंग ओव्हल स्टेडियमवर रंगणार आहेत.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे CEO फोलेत्सी मोसेकी याबाबत बोलताना म्हणाले की, ' हा निर्णय हॉटेल रुम्स आणि एयरपोर्टची सुविधा हे सर्व पाहता घेण्यात आला आहे. आमच्याकडे आयसीसीचे मान्यताप्राप्त ११ स्टेडियम्स आहेत. त्यामुळे उर्वरित ३ स्टेडियम्सकडे दुर्लक्ष करणं कठिण होतं. मात्र हा निर्णय अनेक बाबींचा विचार करुन घेण्यात आला आहे.' (Cricket news in marathi)

ज्या देशाकडे स्पर्धेचे यजमानपद असते. तो संघ थेट या स्पर्धेसाठी पात्र ठरतो. त्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेचा संघ वर्ल्डकप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरला आहे. हे दोन संघ थेट पात्र ठरले असले तरीदेखील नामिबीया संघाला पात्रता फेरीतील सामने खेळून या स्पर्धेत प्रवेश करावा लागणार आहे. यासह जे संघ आयसीसीच्या रँकिंगमध्ये टॉप ८ मध्ये असतील, त्या संघांना थेट प्रवेश मिळणार आहे. तर उर्वरित ४ संघ पात्रता फेरीतून प्रवेश करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani House Firing Case : धाड धाड धाड...! दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांचा पोलिसांकडून एन्काऊंटर

महसूल अधिकाऱ्यांच्या धमकीनंतर शेतकऱ्याची विहिरीत उडी; आत्महत्येने खळबळ

Marathwada Farmers Devastated: मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश; अतिवृष्टीने बळीराजा हवालदिल,ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तीव्र

मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरण; पुतळ्यावर लाल रंग फेकणाऱ्याला अटक

Thursday Horoscope : मनस्ताप वाढवणार, हातून चुका घडणार; 'या' राशीच्या लोकांना अडचणीचा काळ टाळून पुढे जावे लागणार

SCROLL FOR NEXT