IND vs ZIM T20 Series 2024: टी-२० वर्ल्डकपनंतर टीम इंडिया करणार या देशाचा दौरा; पाहा संपूर्ण वेळापत्रक

India Tour Of Zimbabwe: येत्या जून महिन्यात आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना होणार आहे.
team india
team indiasaam tv news
Published On

India Tour Of Zimbabwe Full Schedule:

आगामी टी-२० वर्ल्डकप सुरू व्हायला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. १ जूनपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. तर स्पर्धेतील अंतिम सामना २९ जून रोजी खेळला जाणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना होणार आहे. या मालिकेला ६ जुलैपासून प्रारंभ होणार असून दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. झिम्बाब्वे क्रिकेटने याबाबत घोषणा केली आहे.

हा दौरा टी -२० वर्ल्डकप झाल्यानंतर होणार आहे, त्यामुळे भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संघात स्थान दिले जाऊ शकते. या मालिकेतील सर्व सामने ६,७,१०,१३ आणि १४ जुलै रोजी झिम्बाब्वेतील हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर रंगणार आहेत.

team india
IND vs ENG Test Series: भारत- इंग्लंड मालिका रद्द होणार? इंग्लंडचा संघ परदेशात जाणार! वाचा कारण

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. आपल्या प्रेस रिलिजमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, जुलै महिन्यात भारत - झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. दोन्ही क्रिकेट बोर्डमधील सहकार्याची भावना वाढवणे हा यामागचा उद्देश असणार आहे. (Cricket news in marathi)

team india
IND vs ENG 2nd Test: भारत- इंग्लंड दुसऱ्या कसोटीतील जबरदस्त ५ कॅचेस! Video पाहून तुम्हीच ठरवा कोणती आवडली?

काय म्हणाले बीसीसीआय सचिव जय शाह?

बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की, ' बीसीसीआयने जागतिक क्रिकेटला पुढे नेण्यासाठी नेहमीच मोलाची भूमिका बजावली आहे. आम्हाला माहीत आहे की, झिम्बाब्वे क्रिकेटची पुनर्बांधणी करण्याची करण्याची हीच योग्य वेळ आहे. आम्ही झिम्बाब्वे क्रिकेटला पाठिंबा देण्याचं वचन दिलं होतं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com