Maharashtra Politics: जयंत पाटलांनी करुन दाखवलं; पाटलांनी ईश्वरपूर राखलं'

Islampur Election: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी गेल्या काही दिवसांत जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यानंतर पालिका निवडणुकीत ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांना घेरण्यासाठी अगदी मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली होती. मात्र वाळव्याचा हा वाघ सर्वांना पुरुन उरलाय. पाहूया एक रिपोर्ट.
Islampur Election:
Jayant Patil Strikes Back at the Ballot Boxsaam tv
Published On
Summary
  • राष्ट्रवादीने 30 पैकी 23 जागा जिंकून विरोधकांना धूळ चारली

  • ईश्वरपूरमध्ये लावलेले बॅनर्स लक्षवेधी ठरत आहेत.

  • नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आनंदराव मालगुडे विजयी झाले.

ऐकलंत, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शांत, सयंमी अशी प्रतिमा असलेल्या जयंत पाटलांनी दिलेला हा इशारा. नगरपालिका निवडणुकीत आमदार जयंत पाटलांनी आपली ताकद दाखवत विरोधकांना अस्मान दाखवलंय. सांगली जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 30 पैकी 23 जागा जिंकून विरोधकांना धूळ चारली अन् एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळेच जयंत पाटील समर्थकांनी ईश्वरपूरमध्ये लावलेले बॅनर्स लक्षवेधी ठरत आहेत.'सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही' अशा आशयाचे हे बॅनर्स आहेत.

Islampur Election:
Local Body Election: पालिका निवडणुकीत भाजप नंबर १ चा पक्ष कसा ठरला, कुणाला क्रेडिट आणि कसा होता प्लान?

ईश्वरपूरमध्ये खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभा घेतली होती. तर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवस तळ ठोकला होता. तरीही राष्ट्रवादीचीच सरशी झाली. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आनंदराव मालगुडे विजयी झाले. भाजपला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ तीन जागांवर समाधान मानावं लागलं. निवडणुकीआधी पडळकरांनी जयंत पाटलांचे वडील राजारामबापू यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरुन शरद पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे पडळकरांची तक्रार केली होती. मात्र या खालच्या पातळीवरील टीकेला जयंत पाटलांनी कृतीतून उत्तर दिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com