तुम्हाला ३ इडियट्स मधला वीरू सहस्त्रबुद्धे आठवतो का? जर आठवत असेल तर ते दोन्ही हाताने फळ्यावर लिहियाचे हे देखील आठवत असेल. याच वीरू सहस्त्रबुद्धेंची आठवण गुरुवारी झालेल्या सामन्यात आली. याचं कारण म्हणजे सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या एका गोलंदाजाने चक्क दोन्ही हाताने गोलंदाजी केली आहे.
तुम्ही पाहिलं आणि ऐकलं असेल की, कोणताही खेळाडू डाव्या हाताने किंवा उजव्या हाताने गोलंदाजी करतो. पण तुम्ही कदाचित यापूर्वी पाहिलं नसेल की, एकच गोलंदाज दोन्ही हातांनी गोलंदाजी करतो. गुरुवारी आयपीएलमध्ये असाच एक चमत्कार पाहायला मिळाला. हा आहे श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज कामेंदू मेंडिस. त्याने अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत मात्र त्याने गुरुवारी आयपीएलमध्ये डेब्यू केला.
श्रीलंकेचा ऑलराऊंडर खेळाडू कामेंदू मेंडिस हा केवळ फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकतो म्हणून नाही तर दोन्ही हातांनी गोलंदाजी करू शकतो म्हणून फेमस आहे. ज्याप्रमाणे ३ इडियट्स चित्रपटातील वीरू सहस्त्रबुद्धेकडे एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहिण्याची प्रतिभा होती. त्याचप्रमाणे मेंडिस उजव्या हाताने ऑफब्रेक आणि डाव्या हाताने स्लो ऑर्थोडॉक्स गोलंदाजी करू शकतो. मुळात हे कौशल्य फार कमी गोलंदाजांमध्ये दिसून येते. त्याने २०१८ मध्ये श्रीलंकेसाठी डेब्यू केला होता. पण आता त्याला आयपीएलमध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली.
कामेंदु मेंडिसला सनरायझर्स हैदराबादने आयपीएलपूर्वी झालेल्या ऑक्शनमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं. एसआरएचने या गोलंदाजासाठी फक्त ७५ लाख रुपये खर्च केले. जेव्हा SRH कर्णधार पॅट कमिन्सने त्याला १३ व्या ओव्हरमध्ये पहिल्यांदा गोलंदाजी दिली तेव्हा त्याने चौथ्या बॉलवरच पहिली विकेट घेतली. त्याने रघुवंशीला हर्षल पटेलकडून कॅच आऊट केलं.
कामेंदु मेंडिसने श्रीलंकेसाठी १२ टेस्ट सामन्यांमध्ये तीन विकेट्स घेतल्या असून १९ वनडे सामन्यांमध्ये दोन विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने २३ सामन्यांमध्ये दोन विकेट्स घेतल्या असून टेस्टमध्ये ११८४ रन्स केले आहेत. तर वनडे सामन्यात त्याच्या नावावर ३५३ रन्स आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.