RAHKEEM CORNWALL FIELDING  Twitter
Sports

वजनदार खेळाडूची दमदार फिल्डींग! 140 KG वजनाच्या Rahkeem Cornwall ने डाईव्ह मारत अडवला बॉल- VIDEO

Rahkeem Cornwall Fielding Video: वेस्टइंडीजचा सर्वात वजनदार खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेहकिम कॉर्नवॉलने शानदार फिल्डींग केली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Rahkeem Cornwall Fielding In CPL: क्रिकेटमध्ये फिटनेस अतिशय महत्वाची आहे. तुम्ही गोलंदाज असाल, फलंदाज असाल किंवा फिल्डर, तुम्ही फिट असणं गरजेचं आहे. मात्र १४० किलो वजन असलेल्या रेहकीम कॉर्नवॉलने अनेक फिट खेळाडूंनाही लाजवेल अशी फिल्डींग केली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

वेस्टइंडीजमध्ये सध्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. रेहकीम कॉर्नवॉलही ही स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. तो या स्पर्धेत बारबाडोस रॉयल्स संघाकडून खेळतोय. या संघाकडून खेळताना तो शानदार फलंदाजी आणि गोलंदाजी करतोय. यासह फिल्डींगमध्येही त्याचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. सर्वात वजनदार क्रिकेटपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉर्नवॉलने डाईव्ह मारत चेंडू अडवला.

तर झाले असे की, स्पर्धेतील १३ वा सामना अँटिग्वा अँड बारबुडा फाल्कंस आणि बारबाडोस रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. याच सामन्यात त्याने शानदार फिल्डींग केली, ज्याचा व्हिडिओ बारबाडोस रॉयल्सच्या सोश मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, फलंदाज फाईन लेगच्या दिशेने शॉट मरतो, चेंडू बॅटला लागताच कॉर्नवॉल धावतो. मात्र ज्यावेळी त्याला जाणवतं की, धावून काहीच होणार नाही. त्यावेळी तो डाईव्ह मारतो. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बारबाडोस रॉयल्सने शेअर केलेल्या व्हिडिओवर,'१०० टक्के एफर्ट, २०० टक्के कमिटमेंट..'असं लिहिलं आहे.

रेहकीम कॉर्नवॉलच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर तो वेस्टइंडीज संघासाठी कसोटी संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याला आतापर्यंत वेस्टइंडीज संघासाठी १० कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याला फलंदाजीत २६१ धावा करता आल्या आहेत. तर गोलंदाजीत त्याने ३५ गडी बाद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT