Video: पचांनी वाइड चेंडू दिला नाही; नाराज पोलार्डचा गंमतीदार विरोध
Video: पचांनी वाइड चेंडू दिला नाही; नाराज पोलार्डचा गंमतीदार विरोध  Saam Tv
क्रीडा | IPL

Video: पचांनी वाइड चेंडू दिला नाही; नाराज पोलार्डचा गंमतीदार विरोध

वृत्तसंस्था

CPL 2021 मध्ये अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) संघ त्रिनबागो नाइट राइडर्स (Saint Lucia Kings Vs Trinbago Knight Riders) शानदार कामगिरी करत आहे. संघाचा कर्णधार कायरन पोलार्ड जबरदस्त फार्ममध्ये आहे. पोलार्डचा (Kioran Pollard) एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सेंट लूसिया या संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातील आहे. त्रिनबागो नाईट रारडर्सची फलंदाजी सुरु होती. १९ व्या षटकात न्यूझीलंडचा खेळाडू टिम सीफर्ट फलंदाजी करत होता. तेव्हा पाकिस्तानचा गोलंदाज वहाब रियाजने एक चेंडू वाइड लाईनच्या बाहेर टाकला. परंतू पंचांनी तो चेंडू वाइड दिला नाही.

नॉन स्ट्रायकर एंडला उभा असलेला पोलार्ड हे पाहून थक्क झाला. सीफर्ट सीफर्च चेंडू टाकण्याच्या अगोदर ऑफ स्टंपच्या बाहेरही गेला नव्हता. पोलार्डने याविषयी काही बोलण्यापेक्षा गुपचूप राहून आपला विरोध नोंदवला. तो फलंदाजीच्या क्रिझपासून दूर राहून उभा राहिला. तो शेवटच्या चेंडूसाठीही तिथेच उभा राहिला होता. व्हिडिओ सोशियल मीडियावर व्हायरल होत आहे.

सीपीएल 2021 मध्ये बुधवारी सेंट लुसिया किंग्स आणि त्रिनबागो नाइट रायडर्स यांच्यात रोमांचक सामना खेळला गेला. सेंट लुसिया किंग्स हा सामना 27 धावांनी हरला. हा सामना वॉर्नर पार्क येथे खेळला गेला. या सामन्यात त्रिनबागो नाइट रायडर्सचा कर्णधार किरॉन पोलार्डने नाणेफेक गमावली आणि त्यांना सेंट लुसिया किंग्जचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्रिनबागो नाइट रायडर्सने 20 षटकांत 159 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्जचा संघ निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 131 धावा करू शकला.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac Signs: 'या' ५ राशीच्या लोकांना नात्यापेक्षा Ego वाटतो महत्त्वाचा; क्षणात तोडतात नाती

Rain Alert : विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार, वाचा IMD अंदाज

Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

Rashi Bhavishya : 'या' राशींना आज मिळेल सुखाचा गारवा, वाचा राशिभविष्य

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

SCROLL FOR NEXT