आफ्रिकेचा 'रावलपिंडी एक्सप्रेस' Dale Steyn चा क्रिक्रेटमधून संन्यास

दक्षिण आफ्रिकेचा (Sauth Africa) वेगवान गोलंदाज डेल स्टेनने (Dale Steyn Retires) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
आफ्रिकेचा 'रावलपिंडी एक्सप्रेस' Dale Steyn चा  क्रिक्रेटमधून संन्यास
आफ्रिकेचा 'रावलपिंडी एक्सप्रेस' Dale Steyn चा क्रिक्रेटमधून संन्यास Twitter
Published On

दक्षिण आफ्रिकेचा (Sauth Africa) वेगवान गोलंदाज डेल स्टेनने (Dale Steyn Retires) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यामुळे त्याच्या शानदार क्रिकेट कारकिर्दीचा शेवट झाला आहे. त्याने जगातील काही सर्वोत्तम फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आव्हान दिले आहे. 38 वर्षीय डेल स्टेनने मंगळवारी ट्विटरवर ही घोषणा केली आहे. निवृत्तीच्या घोषणेबरोबरच त्याने ट्विटरवर एक भावनिक संदेशही लिहिला आहे.

आफ्रिकेचा 'रावलपिंडी एक्सप्रेस' Dale Steyn चा  क्रिक्रेटमधून संन्यास
IPL 2022: दोन नविन संघ येण्याचा BCCI ला करोडोंचा फायदा?

स्टेनने लिहिले, "आज मी मला सर्वात जास्त आवडणाऱ्या खेळातून औपचारिकपणे निवृत्त झालो आहे. कुटुंबापासून ते सहकाऱ्यांपर्यंत, पत्रकारांपासून चाहत्यांपर्यंत सर्वांचे आभार, हा एक अद्भुत प्रवास होता”. वेगवान गोलंदाजाने लिहिले, “प्रशिक्षण, सामने, प्रवास, विजय, पराजय, कामगिरी, थकवा, आनंद आणि बंधुता या सर्वांचे 20 वर्षे पुर्ण झाले. सांगण्यासारखे अनेक संस्मरणीय क्षण आहेत. अनेकांचे आभार मानावे तेवढं कमी आहे''.

17 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने 93 कसोटी, 125 एकदिवसीय आणि 47 टी -20 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 22.95 च्या सरासरीने 439 कसोटी विकेट घेतल्या आहेत. 2019 मध्ये, उजव्या हाताचा गोलंदाज शॉन पोलॉकला मागे टाकत आपल्या देशासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला. स्टेनने व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये एकदिवसीय आणि टी -20 फॉरमॅटमध्ये 260-260 विकेट्स घेतल्या. स्टेनने इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB), सनरायझर्स हैदराबाद, डेक्कन चार्जर्स आणि गुजरात लायन्सचे प्रतिनिधित्व केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com